• Mon. Jun 15th, 2026

    सिन्नर बसस्थानकाच्या ताफ्यात ५ नवीन बस दाखल – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 9, 2025
    सिन्नर बसस्थानकाच्या ताफ्यात ५ नवीन बस दाखल – महासंवाद




    नाशिक, दि. ९ (जिमाका वृत्तसेवा): राज्य परिवहन महामंडळातर्फे सिन्नर बसस्थानकास प्राप्त झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील पाच नवीन बसेसचे लोकार्पण राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले.

    यापूर्वी सिन्नर बसस्थानकास पहिल्या टप्प्यात  राज्य परिवहन महामंडळाकडून ५ नवीन बस एप्रिल महिन्यात प्राप्त झाल्या आहेत. लोकार्पणप्रसंगी विभाग नियंत्रक श्रावण सोनवणे, आगर व्यवस्थापक हेमंत नेरकर, बस स्थानक प्रमुख सुरेश पवार, वाहतूक निरीक्षक जयवंत चोपडे यांच्यासह बस चालक, वाहक व कर्मचारी आदी उपस्थित होते.

    मंत्री ॲड कोकाटे यांनी बसमध्ये आसनस्थ होत बसेसला मार्गस्थ केले.

    0000







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed