• Sat. Mar 14th, 2026
    Bhiwandi News: भयंकर! सततचा त्रास असह्य,  तृतीय पंथीयाने आयुष्य संपवलं, भिवंडीत बॉयफ्रेंड रिक्षा चालकाला अटक

    Transgender Ends Life At Bhiwandi: प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका तृतीय पंथीयाने आपल्या आयुष्याची दोर कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडी शहर पोलिसांनी या प्रकरणी रिक्षा चालकाला अटक केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    भिवंडी: रिक्षा चालक असलेल्या प्रियकराच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका 23 वर्षीय तृतीय पंथीयाने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भिवंडी येथे ही घटना घडल्याची माहिती असून तुषार कालीदास लौंडे उर्फ त्रिशा केणे (वय 23) असं आयुष्य संपवलेल्या तृतीय पंथीयाचे नाव असल्याची माहिती आहे. या घटनेने भिवंड परिसरात एकच खळबळ माजली असून प्रियकर रिक्षा चालकाला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

    प्रियकर रिक्षा चालकाला अटक

    या प्रकरणी मृत त्रिशा केणेच्या भावाच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रियकर रिक्षा चालकाला अटक केली आहे. अतीक मोहम्मद फारूख अंसारी (27 रा. भिवंडी) असे अटक केलेल्या प्रियकराचं नाव आहे.
    Ghaziabad News: आमच्या बॉडीला हात लावू नका, तुम्हाला पप्पा म्हणायलाही.. 22 पानांची चिठ्ठी लिहून भाऊ-बहिणीने जीव दिला
    या घटनेबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक तुषार उर्फ त्रिशा केणे भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरात त्यांच्या समुहासोबत राहत होते. तर आरोपी रिक्षा चालक अतिक हा भिवंडी शहरातील समानगर परिसरात राहतो. या दोघांमध्ये काही महिन्यापासून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याच प्रेमसंबंधातून अतिक हा मृतक त्रिशाला शारीरिक, मानसिक जाचासह वारंवार मोबाईल फोनद्वारे त्रास देत होता. यामुळे त्रिशा कंटाळली होती. अखेर या त्रासातून मुक्त होण्यासाठी तिने टोकाचं पाऊल उचललं. प्रियकर रिक्षा चालकाच्या जाचाला कंटाळून अखेर त्रिशाने 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. याप्रकरणी त्रिशाचा भाऊ याच्या फिर्यादीवरून रिक्षा चालक अतिक विरोधात त्रिशाला जीव देण्यास प्रवृत्त केल्याबाबत कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला 2 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. सध्या पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

    भोईवाड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितले की, पीडित आणि 28 वर्षीय आरोपी हे दोघेही भिवंडी शहरातील रहिवासी आहेत. आरोपी पीडितेला वारंवार फोन करून त्रास देत असे, अशी माहिती आहे. सततच्या छळाला कंटाळून पीडितेने 1 ऑगस्ट रोजी घराच्या छताला गळफास लावून जीव दिला.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा