Dattatraya Bharane : कृषीमंत्रिपदाची धुरा दत्तात्रय भरणेंकडे जाताच त्यांनी केलेल्या एक विधानामुळे मात्र ते वादात सापडण्याची शक्यता आहे. महसुलदिनी केलेल्या या विधानामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महसूल दिनासारख्या गंभीर प्रसंगी कृषीमंत्र्यांचे असे भाष्य अनेकांना पचनी पडले नसावे, असे चित्र आहे. महसूल विभागाकडून पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा अपेक्षित असताना, मंत्र्यांनी ‘काम वाकडं करून परत सरळ करण्याचा’ सल्ला दिल्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Ajit Pawar Politics : माणिकरावांचं मंत्रिपद वाचलं अन्….; अजित दादांनी एकाच दगडात दोन पक्षी कसे मारले? वाचा A टू Z
दत्तात्रय भरणे यांनी पुढे शेतकऱ्यांच्या तक्रारींना वेळीच न्याय मिळावा आणि योजनांचा लाभ योग्य हक्कदारांपर्यंत पोहोचावा, असेही नमूद केले. मात्र त्यांना नव्या मंत्रिपदाची धुरा मिळताच अशा अजब विधानामुळे मंत्री महोदय अडचणी येण्याची शक्यता आहे.
स्थानिक पातळीवर या वक्तव्यामुळे वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे. तसेच राज्य पातळीवर देखील पडसाद उमटू शकतात. माणिकराव कोकाटेंनंतर आता दत्तात्रय भरणेंनी वादग्रस्त विधान केल्याने कोणती नवी घडामोडी घडणार पाहणे महत्वाचे असणार आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांत राजकीय पटलावर अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. वादग्रस्त विधान आणि प्रकरणांमुळे महायुतीतील अनेक नेते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यामुळे काहींना डच्चू मिळणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याची सुरुवात माणिकराव कोकाटेंपासून झाल्याचे चित्र आहे. पण कोकाटेंचे मंत्रिपद काढण्यात आले नसून त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे बाकीच्या वादग्रस्त मंत्र्यांचीही धाकधूक वाढणार आहे. यातच आता भरणेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात काय घडतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

