MT Online Poll : “राज ठाकरे भाजप सोडणार नाहीत, उद्धव ठाकरेंचा वापर करून सीट वाढवण्याचं राजकारण सुरू झालं आहे” असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. हा दावा योग्य वाटतो का? असा पोल महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या यूट्यूब अकाऊण्टवरुन विचारण्यात आला होता
एकीकडे राज ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले भाजप नेते हे मनसे प्रमुखांवर तोलून-मापून टिका करताना दिसत आहेत. तर उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेताना मात्र मागे-पुढे पाहत नाहीत. म्हणजेच राज आणि उद्धव यांच्यातील जवळीक वाढत असली, तरी भाजप अद्यापही आशावादी दिसते.
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिकसह राज्यभरातील महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने ठाकरे बंधूंची एकी भाजपप्रणित महायुतीला महागात पडू शकते. त्यामुळे भविष्यात राज ठाकरे हे उद्धव यांच्यापासून दुरावतील आणि महायुतीच्या साथीला किंवा स्वतंत्र मैदानात उतरले, तरी फायदा होईल, अशी आशा भाजपला वाटत असावी. कारण मुंबईत ठाकरे ब्रँड एकत्र आल्यास महायुतीला मोठा फटका बसण्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतात.
राज ठाकरेंनी मीरा रोडच्या नया नगरमध्ये मनसेची सभा घ्यायला हवी होती | नितेश राणे
दरम्यान, “राज ठाकरे भाजप सोडणार नाहीत, उद्धव ठाकरेंचा वापर करून सीट वाढवण्याचं राजकारण सुरू झालं आहे” असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. हा दावा योग्य वाटतो का? असा पोल महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या यूट्यूब अकाऊण्टवरुन विचारण्यात आला होता. यावर एक लाख 43 हजार युजर्सनी मतदान केले आहे.
Maharashtra Politics : हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपात जाण्याची चर्चा, फडणवीसांच्या कट्टर समर्थकाचं टेन्शन हाय, इंदापुरात नाट्यमय घडामोडी
राज ठाकरें भाजप सोडणार नाही अस एकंदरीत दिसते. उद्धव ठाकरेंचा वापर करून सीट वाढवण्याचं राजकारण सुरू झालं आहे ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) July 14, 2025
पोलचे निष्कर्ष काय?
एक लाख 43 हजारपैकी 65 टक्के म्हणजे 92 हजाराहून अधिक जणांनी ‘हो’ अर्थात दमानियांच्या आरोपामध्ये तथ्य आहे, असे मत व्यक्त केले आहे. तर 31 टक्के म्हणजेच 44 हजार युजर्सनी ‘नाही’ अर्थात दमानियांच्या आरोपात अर्थ नाही, असे मत नोंदवले आहे. उर्वरित 4 टक्के म्हणजेच 7-8 हजार युजर्सनी तटस्थ भूमिका घेतली आहे. इथे क्लिक करुन पाहा निकालाचे निष्कर्ष

