• Sun. Mar 15th, 2026

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन सदस्य डॉ.दिलीप भुजबळ- पाटील यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 18, 2025
    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन सदस्य डॉ.दिलीप भुजबळ- पाटील यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ – महासंवाद




    मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये (MPSC) डॉ. दिलिप भुजबळ- पाटील यांची  सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे अध्यक्ष श्री. रजनीश सेठ यांनी श्री. भुजबळ- पाटील यांना आयोगाच्या बेलापूर येथील मुख्यालयात शपथ दिली.

    या वेळी आयोगाचे सदस्य अभय वाघ, सतिश देशपांडे, राजीव निवतकर, महेंद्र वारभुवन यांच्यासह आयोगाचे सहसचिव अवताडे उपस्थित होते.

    ०००००

    राजू धोत्रे/विसंअ







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed