• Thu. Mar 19th, 2026

    महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 18, 2025
    महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक – महासंवाद




    मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चितन कीर्तीभाई शाह (वय ३८ वर्षे) रा. भायखळा (पूर्व), मुंबई वास १९२.४५ कोटी इतक्या किंमतीचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घेऊन करचोरी केल्याप्रकरणी अटक केली आहे.

    ही अटक मेसर्स हेवी इंजिनीरिंग प्रॉडक्ट्स आणि मेसर्स ए. के. इंटरनं शनल इंजिनीरिंग या फर्म मध्ये करण्यात येत असलेल्या पुढील तपासाचा एक भाग आहे. विभागाने अशा करचोरी करणाऱ्या करदात्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे, जे वस्तू किंवा सेवा प्रत्यक्ष न पुरवता बनावट बिले तयार करून IIC चा अवध लाभ घेत आहेत. हे महाराष्ट्र/केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे उल्लंघन आहे.

    श्री. चिंतन कीतीभाई शाह हे मेसर्स हेवी इंजिनीरिंग प्रॉडक्ट्स या फर्मचे प्रोप्रायटर व तसेच मेसर्स ए. के. इंटरनॅशनल इंजिनीरिंग या त्याच्या पत्नीच्या नावे असलेली कंपनीचे दैनंदिन व्यवहार हाताळणी करणारे असून या दोन्ही फर्ममार्फत सुमारे १९२.४५ कोटीची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेतला असून आरोपी श्री. चितन कीर्तीभाई शाह यास अटक करून न्यायदंडाधिकारी, एस्प्लेनेड कोर्ट यांचेसमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास ३१ जुलै, २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

    ही कारवाई सहायक राज्यकर आयुक्त (डी-0315), श्री. रमेश उ. अवघडे व सहायक राज्यकर आयुक्त (डो-0313), श्री. नितिनचंद्र ग. पाटील यांच्या नेतृत्वाखाली DC-E-0303 युनिटच्या राज्यकर निरीक्षकांसह पार पाडण्यात आली.

    महाराष्ट्र जीएसटी विभागाने बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. राज्यकर विभागाने करदात्यांना जीएसटी कायद्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आणि कोणत्याही प्रकारच्या करचोरीपासून दूर राहण्याची ताकीद दिली आहे. बनावट व्यवहार करणा-यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असे विभागामार्फत कळविण्यात आले आहे

    ००००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *