Jitendra Awhad Andolan at Vidhan Sabha Gate : विधानभवनाच्या मागच्या गेटवरुन जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांना पोलिस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्या आंदोलन केले
विधानभवनाच्या मागच्या गेटवरुन जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांना पोलिस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्या आंदोलन केले. सुमारे तासभर चाललेल्या या राड्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत धरपकड सुरु केली. यावेळी आव्हाड थेट पोलिसांच्या गाडीखाली चालले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अक्षरशः फरफटत बाहेर ओढले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे देखील घटनास्थळी हजर होते. विधिमंडळाचे अधिवेशन आज, 18 जुलै रोजी संपणार आहे. आदल्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. त्यामध्ये त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी झालेल्या वाद आणि त्यानंतर आलेल्या धमक्यांविषयी माहिती दिली. यानंतर विधानभवनाच्या लॉबीत आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार वाद झाला.
Raj Thackeray : उद्धवजींसोबत जाऊया, मनसे नेत्यांचा सूर, तरी राज ठाकरेंचं ‘वेट अँड वॉच’ का? अखेर उत्तर मिळालं
पडळकर-आव्हाड समर्थकांमध्ये राडा, विधानभवानातील राड्यावर ठाकरे संतापले
गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात बाचाबाची झाली. “यावेळी मार खाणाऱ्याला पोलिसांकडून अटक केली जात आहे. तर मारहाण करणाऱ्या पाच जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे. त्यांना पोलीस वडापाव आणि तंबाखू मळून देत आहेत” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
Aaditya Thackeray : तुम्ही ऑफर दिली, म्हणून मी स्वागताला उभा राहिलो; आदित्य ठाकरेंची मिश्कील कमेंट, फडणवीस म्हणाले…
पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे.म्हणजे मार… pic.twitter.com/U3Jfnuyzm9
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 17, 2025
विधानभवनाचा आखाडा
विविध मुद्द्यांवर चर्चा घडणाऱ्या विधिमंडळाच्या परिसराला गुरुवारी अक्षरश: आखाड्याचे स्वरूप आले. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला गेला. दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांच्या समोर उभे ठाकले आणि अगदी हाणामारीपर्यंत हे प्रकरण गेले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत अहवाल मागवून कारवाई करण्याची घोषणा केली.

