Pune Spa Centre Illegal Activity : विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अलीकडेच गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत अवघ्या 15 वर्षाच्या मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचे दिसून आले.
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अलीकडेच गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत अवघ्या 15 वर्षाच्या मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचे दिसून आले. हा प्रकार अधिक चिंताजनक आहे. मानवी तस्करीच्या स्वरूपात अल्पवयीन मुलींना राज्याबाहेरून किंवा ग्रामीण भागातून शहरात आणले जात असून त्यांना जबरदस्तीने या धंद्यात आणले जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील बेकायदा ‘स्पा’चा आढावा घेतला असता भयानक चित्र समोर येते.
संबंधित त्रिकुटाने सुरू केलेले ‘स्पा’ व्यवस्थापकांमार्फत चालविले जात असल्याचे पोलिस दलातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. पोलिस आयुक्तांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि स्वतंत्र व सक्षम यंत्रणा उभारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शंभराहून अधिक स्पा केंद्र चालविणारे त्रिकूट आणि त्यामागील गुन्हेगारी साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याचीही मागणीही आहे.
पोलिसांची फुटकळ कारवाई
गुन्हे शाखेच्या काही यंत्रणांकडून अधूनमधून कारवाई केली जाते. मात्र, ती केवळ निवडक ‘स्पा’ पुरती मर्यादित राहते. ‘धनराज’, ‘प्रिया’ आणि’ अनुज’ या प्रमुख सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. यामुळे या जाळ्याचे मुख्य चालक कोण, याचा शोध घेण्यापेक्षा पोलिस केवळ ‘फुटकळ कारवाया करत असल्याचा आरोपही केला जात आहे.
Sangli News : 19 किमी धावले अन् धाप लागली; सांगलीतील 26 वर्षीय लेफ्टनंटचा हृदयद्रावक मृत्यू
कारवाई का घटली?
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून यापूर्वी वेश्याव्यवसायावर कारवाई केली जात होती. मात्र, हा विभाग सर्व प्रकारच्या बेकायदा धंद्यांवर कारवाई करीत असे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या विभागाला बरखास्त करून ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग’ कार्यरत केला. या विभागाने प्रामुख्याने वेश्याव्यवसायावर कारवाई करणे अपेक्षित आहे; पण या बदलानंतरही ठोस कारवाई झाली नाही.
Jalgaon Crime News | महिला टोळीकडूनच मुलीची फसवणूक तर जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना
Navi Mumbai Crime : खारघरच्या 28 वर्षीय डॉक्टरवर साताऱ्यातील लॉजमध्ये लैंगिक अत्याचार, अश्लील व्हिडिओही काढले, पुण्यातील 23 वर्षीय तरुण अटकेत
जाहिरातींकडे दुर्लक्ष?
समाज माध्यमांसह विविध जाहिरात प्लॅटफॉर्मवरून ‘बॉडी स्पा’, ‘रिलॅक्सेशन सेंटर’ या नार्वाखाली जाहिरात केली जाते. मात्र, पोलिस यंत्रणेने त्याकडे डोळेझाक केलेली आहे, की दुर्लक्ष, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

