• Mon. Mar 9th, 2026

    छांगूर बाबाच्या रॅकेटचे धागेदोरे पुण्यापर्यंत; 100 कोटींची मालमत्ता, दहशतवादी कनेक्शनही उघड

    छांगूर बाबाच्या रॅकेटचे धागेदोरे पुण्यापर्यंत; 100 कोटींची मालमत्ता, दहशतवादी कनेक्शनही उघड

    उत्तर प्रदेशात छांगुर बाबाच्या अवैध धर्मांतरणाच्या प्रकरणात मोठा गाजावाजा सुरू आहे. त्याचा साथीदार मोहम्मद अहमद खान सध्या पोलीसांच्या चवकशीच्या गडबडीत आहे. खान आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतलेला असून त्याचे दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याची चर्चा आहे.

    पुणे: उत्तर प्रदेशात अवैध धर्मांतरण प्रकरणी अटक झालेल्या जमालुद्दीन उर्फ ​​छांगूर बाबाच्या नेटवर्कचा तपास सुरू आहे. या प्रकरणात मोहम्मद अहमद खान नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. तो छांगूर बाबाचा निकटचा सहकारी आणि टोळीचा आर्थिक व्यवस्थापक असल्याचे मानले जाते. एटीएसच्या माहितीनुसार, मोहम्मद अहमद खान केवळ अवैध धर्मांतरणातच नव्हे, तर संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांमध्येही सक्रिय होता.

    मोहम्मद अहमद खान हा छांगूर बाबाचा उजवा हात मानला जातो. तो छांगूर बाबाच्या आर्थिक व्यवहारांचे आणि धर्मांतरणाच्या फंडिंगचे व्यवस्थापन करतो. उत्तर प्रदेश एटीएस, लखनऊ आणि बलरामपूर पोलिसांची टीम आरोपीच्या शोधात छापेमारी करत आहे. परंतु अद्याप त्याला पकडण्यात यश आलेले नाही. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपी वारंवार आपले ठिकाण बदलत असल्यामुळे त्याला पकडणे कठीण झाले आहे.

    बलरामपूरचा रहिवासी असलेल्या मोहम्मद अहमद खान याच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता हडपणे आणि भूमाफियागिरीशी संबंधित अनेक गुन्हे दाखल आहेत. ही सर्व कृत्ये धर्मांतरणाचे नेटवर्क मजबूत करण्यासाठी केली जात होती, असा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खानने पुण्यातील पिंपरी परिसरात सुमारे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जमा केली आहे. येथे कथितरित्या एक कट्टरपंथी प्रशिक्षण केंद्र चालवले जाते, जिथे धर्मांतरणासाठी लोकांना प्रवृत्त केले जाते आणि त्यांना कट्टर इस्लामी विचारधारेचे प्रशिक्षण दिले जाते.

    प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मोहम्मद अहमद खानला अटक करण्यासाठी लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. खानच्या अटकेमुळे धर्मांतर रॅकेट आणि दहशतवादी फंडिंगचे नेटवर्क उद्ध्वस्त करता येईल, असा विश्वास यंत्रणांना आहे. छांगूर बाबा च्या आलिशान कोठीवर प्रशासनाने बुलडोझर चालवला. ती कोठी अवैधपणे बांधली गेली होती. छांगूर बाबा आपल्या साथीदारांसोबत तेथे राहत होता. तो तेथूनच धर्मांतरणाचे रॅकेट चालवत होता. याव्यतिरिक्त, अनेक संशयास्पद कारवाया तेथे केल्या जात होत्या.

    छांगूर बाबाच्या आलिशान कोठीवर प्रशासनाने बुलडोझर चालवला. तिथे अनेक वस्तू सापडल्या. छांगूर बाबा केवळ परदेशी वस्तू वापरत होता. या वस्तू दुबईहून येत होत्या. छांगुर बाबाने कोठीच्या आत एक गुप्त कक्ष बनवला होता, जिथे धर्मांतरण झालेल्या मुलींना ठेवले जात होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खानने महाराष्ट्रातील पिंपरी परिसरात सुमारे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जमा केली आहे. येथे कथितरित्या एक कट्टरपंथी प्रशिक्षण केंद्र चालवले जाते, जिथे धर्मांतरणासाठी लोकांना प्रवृत्त केले जाते आणि त्यांना कट्टर इस्लामी विचारधारेचे प्रशिक्षण दिले जाते.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा