Mumbai Married Woman ends life : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारे वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच अंधेरीच्या साकीनाका परिसरातही अशीच एक घटना पुढे आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारे वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच अंधेरीच्या साकीनाका परिसरातही अशीच एक घटना पुढे आली आहे. मूळची उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील ही वैष्णवी (बदललेले नाव) ही साकीनाका परिसरात पती आणि सासरच्य मंडळींसोबत राहत होती. तिचे हे दुसरे लग्न होते. पतीकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून तिने पहिल्या लग्नानंतर घटस्फोट घेतला होता.
मुलीसाठी चांगला मुलगा पाहून वडिलांनी 2024 मध्ये तिचे दुसरे लग्न लावून दिले. पहिल्या लग्नाप्रमाणेच यावेळीही माहेरच्यांनी संसार उपयोगी साहित्य, फर्निचर, तिला पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने, पतीला दोन तोळ्यांचे दागिने आणि चार लाख रुपये रोख दिले.
Pune crime news | कोंढवा परिसरात धक्कादायक घटना; डिलिव्हरी बॉयकडून दिवसाढवळ्या तरुणीवर अत्याचार
लग्नानंतर काही दिवस उत्तर प्रदेश येथे राहिल्यानंतर ती पती आणि सासरच्या इतर मंडळींसह मुंबईत राहू लागली. काही दिवस चांगले गेल्यानंतर दुसऱ्या पतीने आणि त्याच्या घरच्यांनी रंग दाखवायला सुरुवात केली. फ्लॅट घेण्यासाठी पैसे हवेत असे सांगून ‘वैष्णवी’च्या वडिलांकडून पाच लाख रुपये घेण्यात आले. फ्लॅटचे कर्जही पतीने तिच्या नावावर घेतले होते. त्यामुळे हप्ते भरण्यासाठी पैसे हवे असल्याचे सांगत तो आणि सासरची मंडळी तिचा छळ करत होते.
Crime News : 52 वर्षांच्या मामाशी 15 वर्ष अनैतिक संबंध, नववधूने 24 वर्षीय नवऱ्याचा काटा काढला, सोनमपासून प्रेरणा घेतल्याची कबुली
तिने पती आणखी पाच लाख रुपये मागत असल्याचे वडिलांना सांगितले. मात्र आता पैसे नाहीत, मी तुझ्या पतीची समजूत काढतो, असे वडिलांनी तिला सांगितले. सासरच्यांचा छळ थांबत नव्हता आणि वडिलांकडेही पैसे नव्हते. त्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती. त्यातच तिने 28 जूनला सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली.
Pune Crime : मॅडम कुरिअर तुमचं नसेल, पण सही करा; दार उघडताच स्प्रे मारला, अत्याचार करुन सेल्फी, मेसेज लिहिला ‘मी पुन्हा येईन’
ही खबर कळताच तिचे कुटुंबीय मुंबईत आले. ती आणि तिच्या सासूचे भांडण झाल्याने, पतीने शिवीगाळ करत मारहाण केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे समजले, तिच्या भावाने साकीनाका पोलिस ठाण्यात बहिणीच्या पतीविरुद्ध तक्रार केली. यावरून साकीनाका पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

