Eknath Shinde on Nana Patole : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज गदारोळ झाला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळानंतर, पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले, ज्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘बाप बापच असतो, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत’. तसेच, पटोलेंनी प्रसिद्धीसाठी हे कृत्य केल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
विधानसभा अध्यक्षांच्या या कारवाईवरुन विरोधकांनी सभात्याग केला. या घटनेनंतर नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्यांनी केलेल्या एका वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हो, बाप बापच असतो, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे, असं म्हटलं. तसेच नाना पटोलेंनी हा स्टंट प्रसिद्धीसाठी केला. कारण दिल्लीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीत आता त्यांचं नाव कुठेच दिसत नाही, असा टोला एकनात शिंदे यांनी लगावला.
Nana Patole : शेतकऱ्यांचा मुद्दा निघताच नाना पटोले भडकले, सभागृहात राडा, काय घडलं?
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
“नाना पटोले हे स्वत: विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांना विधानसभेचं कामकाज माहिती आहे. सभागृहाची प्रतिष्ठा राखली पाहिजे हे त्यांनाही माहिती आहे. पण ते आज का इतके आक्रमक झाले ते कळलं नाही. ते थेट अध्यक्षांच्या दिशेला गेले आणि त्यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून अशा कृतीची अपेक्षा नव्हती. त्यांनी दिल्लीत देखील काही दिवसांपासून चर्चा दिसत नव्हती. नावाची चर्चा झाली पाहिजे, पुन्हा चर्चेत आणि प्रकाशझोतात यायला पाहिजे म्हणून त्यांचे हे प्रयत्न आहेत का? म्हणून पुन्हा मोदींचच नाव घेतलं पाहिजे. कारण बाप बापच असतो. विधानसभेत जनताने दिले झटके आणि काँग्रेस 16 वर अटकले, त्यांनी त्यातून बोध घेतला पाहिजे”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

