सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत माजी आमदार राजा राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीमध्ये रणवीर राऊत यांनी विरोधकांना धमकी दिली. आमदार दिलीप सोपल यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी शिवीगाळ केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
2019 साली राजा राऊत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत विधानसभा निवडणूक जिंकली होती .2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून विधानसभा लढवली. मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दिलीप सोपल यांनी राजा राऊत यांचा पराभव केला. रणवीर राऊत हे माजी आमदार राजा राऊत यांचे मोठे चिरंजीव आहेत.
Beed Crime : ‘सगळे गेले की सर मला कॅबिनमध्ये थांबवून कपडे काढायला लावायचे, अन्…’; अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीने बीड हादरलं
बार्शी मार्केट कमिटीमध्ये चेअरमनपद देखील रणवीर राऊत यांनी भूषवले आहे. सद्यस्थितीला रणवीर राऊत डाळ मिलचा कामकाज सांभाळत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत अधिक माहिती घेतली असता जवळपास आठ दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ आहे. रणवीर राऊतचा मित्र चारचाकी वाहन घेऊन जाताना दुसऱ्या एका चारचाकी वाहनाची कट मारला. यावरून वादास तोंड फुटले. बाचाबाची होत असताना रणवीर राऊत यांना बोलावले आणि वाद विकोपाला गेला.
मान मुरगळेन…माजी आमदार पुत्राची दादागिरी, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
वादविवाद करणारे तरुण हे विरोधी पक्षातील किंवा विरोधी गटातील असल्याने रणवीर राऊत यांच्या रागाचा पारा चढला आणि शिवीगाळ केला. वादविवाद होताना रणवीर राऊत आल्याने समोरच्या तरुणांनी नमती भूमिका घेतली आणि शिवीगाळ करताना व्हिडीओ चित्रीकरण केले. रणवीर राऊत शिवीगाळ करताना व्हिडीओ बार्शी तालुक्यातील देखील प्रचंड व्हायरल झाला असून रणवीर राऊत यांच्या व्हिडीओची मोठी चर्चा सुरू आहे.

