• Wed. Mar 18th, 2026
    Covid-19 पुन्हा वाढतोय, केईएममध्ये करोनाचे सात रुग्ण; चाचणी सकारात्मक, आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

    KEM Hospital Covid-19 Patients : मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णालयातील सात जणांची करोना चाचणी सकारात्मक असल्याने सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये करोनाने पुन्हा डोके वर काढले असून, तेथे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : हाँगकाँग आणि सिंगापूर येथे करोनाने पुन्हा डोके वर काढले असतानाच येथील केईएम रुग्णालयात दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, हे मृत्यू करोनामुळे झाले नसून सहव्याधींमुळे झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, केईएममधील सात रुग्णांची करोना चाचणी सकारात्मक आल्याने त्यांना सेव्हन हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

    परळ येथील ५८ वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तिला केईएममध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी, १८ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी घेण्यात आलेल्या स्वॅब चाचणीत तिला करोना असल्याचे स्पष्ट झाले. काही दिवसांपूर्वी १३ वर्षीय मुलीचाही करोनामुळे मृत्यू झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले, असा दावा माजी महापौक किशोरी पेडणेकर यांनी केला. मात्र, ५८ वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे तर १३ वर्षीय मुलीचा मूत्रपिंड विकार या सहव्याधींमुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
    Covid-19 New wave in Asia : कोविड-१९ पुन्हा डोकं वर काढतोय, आशियातील या देशात करोना व्हायरसचे नवे रुग्ण
    केईएममधील सात रुग्ण करोना चाचणीत सकारात्मक आढळल्याने त्यांना सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सगळ्या बाधितांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

    मुंबईत सध्या ८ करोनाग्रस्त रुग्ण आढळल्याचं समोर आलं आहे. तर अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आणि आयपीएलच्या हैदराबाद संघातील खेळाडू ट्रॅव्हिस हेड या दोघांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

    Covid-19 पुन्हा वाढतोय, केईएममध्ये करोनाचे सात रुग्ण; चाचणी सकारात्मक, आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

    कोविड-१९ ची नवीन लाट –

    दरम्यान, २०२० मध्ये भारतासह संपूर्ण जगात कोविड-१९ ने एकच हाहाकार माजवला होता. आता पुन्हा एकदा पाच वर्षांनी आशियातील हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोविड-१९ ची नवीन लाट पसरली आहे. कोविड-१९ ची नवीन लाट पसरत असल्याचं हाँगकाँग आणि सिंगापूरमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसंच ही प्रकरणं वाढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. करोनामुळे रुग्णालयात दाखल होण्याचं रुग्णांचं प्रमाण ३० टक्क्यांनी वाढलं असून करोना चाचण्यांमध्येही वाढ झाल्याची माहिती हाँगकाँग, सिंगापूरमधून देण्यात आली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *