• Thu. Mar 12th, 2026
    उच्चशिक्षित तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् नराधमानं अत्याचार केला; पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

    Nagpur Crime News : तब्बल एक डझन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवकाने त्यांचे शारीरिक शोषण केल्याची खळबळजनक घटना कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवकाला अटक केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    म.टा.प्रतिनिधी,नागपूर : तब्बल एक डझन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवकाने त्यांचे शारीरिक शोषण केल्याची खळबळजनक घटना कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अत्याचारसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली आहे. अर्जुन राजेंद्र कनोजे (३०, रा. कामठी) असे अटक तरुणाचे नाव आहे.

    वृत्तानुसार, रिया ही तरुणी उच्चशिक्षत आहे. ती एका आयटी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. पाच वर्षांपूर्वी तिला कळमेश्वरमध्ये प्लॉट खरेदी करायचा होता. यावेळी अर्जुन हा एका कंपनीसाठी प्रॉपर्टी डिलिंगचे काम करायचा. मित्राच्या माध्यमातून तिची अर्जूनसोबत ओळख झाली. अजुर्नने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विवाहित असतानाही त्याने अविवाहित असल्याचे रियाला सांगितले.

    १८ डिसेंबर २०२४ ला त्याने रियाला रामटेक परिसरात आयो हॉटेलमध्ये नेले. नंतर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. रियाने नकार दिला, पण अर्जुनने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने रियाचे आक्षेपार्ह छायाचित्र व चित्रफित काढली. त्याआधारे तो तिला ब्लॅकमेल करायला लागला. तिच्याकडून खंडणी उकळून अर्जुनने कारही खरेदी केली. काही दिवसांपूर्वी ती अर्जुनच्या घरी गेली. अर्जुन हा विवाहित असल्याचे तिला कळाले. तिने त्याच्यासोबतचे संबंध संपुष्टात आणले. अर्जुनने रियाला छायाचित्र व चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली.

    रियाने त्याच्याबाबत माहिती काढली असता अर्जुनने तब्बल १२ तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शारीरिक शोषण केले. तरुणींकडून लाखो रुपयांची खंडणी उकळली, असे रियाला समजले. रियाने कन्हान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल करून अर्जुनला अटक केली.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed