• Tue. Jun 16th, 2026
    भीषण अपघात! ट्रेलर आणि एसटीची जोरदार धडक; बस एका बाजूने अक्षरश: चिरली अन् चार जण दगावले

    Raigad News : रायगडच्या तळा तालुक्यात भीषण अपघात घडला आहे. ट्रेलर आणि एसटी बसची जोरदार धडक झाली. गुरुवार ८ मे ला दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी हा अपघात घडला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    रायगड : रायगडच्या तळा तालुक्यात भीषण अपघात घडला आहे. ट्रेलर आणि एसटी बसची जोरदार धडक झाली. गुरुवार ८ मे ला दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी हा अपघात घडला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० पेक्षा अधिकजण जखमी झाल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून पंचनामा सुरु आहे.

    वृत्तानुसार, तळयाकडून अगरदांडयाच्या दिशेने निघालेल्या ट्रेलरने रहाटाड कडून येणाऱ्या एसटीबसला जोरदार धडक दिली. तारणे येथील तीव्र वळणावर हा अपघात घडला आहे. अपघात एवढा भयानक होता की, एसटी बस एका बाजूने पूर्णपणे चिरली गेली. सदरच्या अपघाताची नोंद तळा पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालय दाखल करण्यात केले आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, तृप्ती विजय खुटीकर, (22 वर्षे) रा. रहाटाड कोळीवाडा, लक्ष्मण राया ढेबे (38 वर्ष) रा. धनगरवाडी, अनन्या कपेश गमरे (7 वर्ष) रा. आंबेत, विठ्ठल धोंडू कजबते (55 वर्ष) रा. खांबवली अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रवाना केले आहेत.

    तर, काशिनाथ जानू ढेबे रहाटाड (वय 52), सविता शांताराम गायकवाड (वय 45) खांबवली, यशवंत नारायण रामाणे (वय 77) भोईवाडी तळा, लक्ष्मण नाग्या घायरी (वय 60) रहाटाड कोळीवाडा, सविता शांताराम गायकवाड तंग (वय 45) खांबवली, वैष्णवी विजय फुटेकर (वय 25) खांबवली तळा, ससुबाई तुकाराम गायकवाड (वय 25) रहाटाड तळा, जयश्री नामदेव गवाणे (वय 60) रहाटाड तळा, संगीता अंकुश जाधव (वय 40) रहाटाड तळा, मोरेश्वर ढेबे (वय 19) हे गंभीर जखमी झाले आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed