Shiv Sena Vs NCP SP: जितेंद्र आव्हाड यांच्या वर्चस्वाला धक्का देत एकनाथ शिंदे यांनी माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जनसंपर्क विभागामार्फत पाठवलेल्या निमंत्रण मेसेजमध्ये पक्षप्रवेशासाठी 10.10 वाजताची वेळ ठरवण्यात आलेली होती. मुळात ठाण्यामधील या सर्व माजी नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज टायमिंग साधत हा पक्षप्रवेश घडवून आणलेला पाहायला मिळतो आहे. साधारणतः पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम वेळेत होत नाहीत, असा अनुभव सर्व माध्यम प्रतिनिधींचा आहे. मात्र नेहमी उशिरा होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंनी फाटा देत आज वेळेत कार्यक्रम उरकून घेतला.
Sharad Pawar : हम साथ साथ है? एकत्र येण्याबाबत अजित पवार-सुप्रिया सुळेंनी एकत्र बसून ठरवावं, शरद पवार यांचं सर्वात मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वर्चस्वाला धक्का देत एकनाथ शिंदे यांनी माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघातील माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा 10.10 वाजताचा पक्षप्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाण्यात काय बदल घडवून आणतो, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

