Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांची मुलगी वैभवी न्यायासाठी मैदानात उतरली. दुःखातही तिने बारावीची परीक्षा दिली आणि ८५.१३ टक्के गुण मिळवले. तिच्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिला फोन करून अभिनंदन केले. वैभवीला डॉक्टर व्हायचे आहे, हे तिने सांगितले. सुप्रिया सुळे यांनीही वैभवीला शुभेच्छा दिल्या. तिच्या संघर्षाचे आणि यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यापासून वैभवीवर काैतुकांचा वर्षाव होत आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैभवीला फोन केला. यावेळी एकनाथ शिंदे हे वैभवीला किती टक्के मार्क पडले हे विचारताना दिसले. यासोबतच त्यांनी तुला काय बनायचे आहे हे देखील विचारले. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील एकनाथ शिंदे यांना बोलताना दिसले.
Vaibhavi Deshmukh 12th Exam Result : सरपंच संतोष देशमुखांच्या कन्येचं घवघवीत यश, बारावीच्या परीक्षेत अभिमानास्पद गुण, पाहा किती?यासोबतच एकनाथ शिंदे म्हणाले की, तिला पुढे जे बनण्याची इच्छा आहे ते बनू द्या. धनंजय देशमुख म्हणाले की, एक ते दोन दिवसात ठरू की, पुढे तिला काय करायचे. फक्त एकनाथ शिंदेच नाही तर वैभवी देशमुखचे अभिनंदन करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी देखील फोन केला होता. आता एकनाथ शिंदे आणि वैभवी देशमुख यांच्यामधील संवादाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Vaibhavi Deshmukh : बारावीत ८५.१३ टक्के, एकनाथ शिंदेंचा संतोष देशमुखांच्या लेकीला फोन, शुभेच्छा देत म्हणाले..
वैभवी देशमुख हिने अगोदरच म्हटले आहे की, माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी डॉक्टर व्हावे आणि मला त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. वैभवी देशमुख ही वडिलांना न्याय मिळून देण्यासाठी राज्यभर फिरताना दिसली. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येदरम्यानचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. देशमुखांच्या हत्येवेळचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आली आहेत.

