• Tue. Sep 22nd, 2026

MNS Kalyan :मिस्टर इंडियाचे लाल चष्मा घालून, हातात रंगाच्या बादल्या ब्रश घेऊन मनसेचं आंदोलन

MNS Kalyan :मिस्टर इंडियाचे लाल चष्मा घालून, हातात रंगाच्या बादल्या ब्रश घेऊन मनसेचं आंदोलन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2025, 2:04 pm

केडीएमसीने मुरबाड रोड ते गुरुदेव हॉटेलपर्यंत डिव्हायडर धुणे व रंगवण्याच्या कामाचे बिल ठेकेदाराला दिली आहेत.मनसे कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकिस आणली.प्रत्यक्षात स्टेशन परिसरात गुरुदेव हॉटेलपर्यंत डिव्हायडर नसताना ही बिल महापालिकेने दिलीच कशी असा सवाल मनसे कार्यकर्त्यांनी केला.केडीएमसीच्या या भ्रष्टाचाराविरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी मिस्टर इंडियाचा चष्मा घालून स्टेशन परिसरात आंदोलन केलं.यावेळी प्रतिकात्मक डिव्हायडर रंगवत केडीएमसी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई केली नाहीतर मनसे अधिकाऱ्यांना ठोकणार असा इशारा केडीएमसीला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed