• Sat. Jul 4th, 2026

    ऊसतोड कामगारांच्या आरोग्य समस्यांसाठी टास्क फोर्स स्थापन करावा– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 26, 2025
    ऊसतोड कामगारांच्या आरोग्य समस्यांसाठी टास्क फोर्स स्थापन करावा– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – महासंवाद




    मुंबई, दि. २६ : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या आरोग्यविषयक समस्यांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करावा, असे निर्देश  विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

    बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया प्रकरणी गठीत समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला. त्या अनुषंगाने मंत्रालयीन विभागाने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

    उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,  ऊसतोड कामगार महामंडळ कार्यरत असल्याने सामाजिक न्याय विभागाने ऊसतोड कामगार महामंडळ आणि अन्य संबंधित विभागांच्या सहकार्याने सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करावा.

    या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यास गती मिळेल. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या व समिती अहवालाच्या अनुषंगाने कार्यवाही करावी असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

    0000

    मोहिनी राणे/ससं/







    ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ च्या माध्यमातून महाराष्ट्र डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला, प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर – महासंवाद
    Ratnagiri Rain : रत्नागिरीत पावसाचे रौद्ररुप, मोठे भूस्खलन; कासई शिंदेवाडीजवळ दरड कोसळली, जगबुडीने इशारा पातळी ओलांडली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed