Maharashtra Budget Session 2025 Updates : राज्यात झालेल्या पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाला तालिका अध्यक्ष म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
पक्षफुटीनंतर ठाकरे गटाला पहिल्यांदाच संधी
पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडून विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना तालिका अध्यक्ष जाहीर करण्यात आले आहे. सुनील राऊत ठाकरे गटाची मुलूखमैदानी तोफ आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू आहेत. राज्यात झालेल्या पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाला तालिका अध्यक्ष म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
Dattatraya Gade : म्हणून तरुणीवर दोन वेळा अत्याचार, धक्कादायक कारण पुढे, पोलिसांनी बंद शिवशाहीतून ‘आवाजाची टेस्ट’ केली अन्…
सरदेसाई फडणवीसांच्या भेटीला
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’च्या अंगणातील अर्थात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई हेसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. मतदारसंघातील विकासकामांसाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सरदेसाई असो किंवा राऊत, दोघेही ठाकरे कुटुंबाच्या जवळचे आहेत. सरदेसाई हे ठाकरेंचे नातेवाईकच, तर राऊत हे निकटवर्तीय. त्याचप्रमाणे गेल्या वेळी प्रमाणे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांना चॉकलेट देऊन शुभेच्छा दिल्यात. त्यामुळे या तिन्ही कृत्यांमधून भाजप आणि ठाकरे गटातील दुरावा मिटत असल्याची चर्चा आहे.
Maharashtra Budget Session: संजय राऊतांच्या भावाला राहुल नार्वेकरांकडून मानाचं स्थान, तर वरुण सरदेसाई फडणवीसांच्या भेटीला, ठाकरे-भाजप जवळीक वाढली?
हिवाळी अधिवेशनावेळी भेट
याआधी डिसेंबर २०२४ मध्ये नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. त्यांनी त्यावेळीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला देण्यात यावे, अशी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत होते. तो मुद्दा तेव्हापासून अधांतरीच राहिला.
Swargate Rape Case : त्या पोरीला मी ७५०० रुपये दिलेत, दत्ता गाडेचा पोलिसांकडे दावा, बँक अकाऊण्ट तपासताच चक्रावणारी बाब समोर
विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला?
यंदाच्या अधिवेशनातही ठाकरे गटाला विरोधीपक्ष नेतेपद मिळण्याची चर्चा आहे. संख्याबळ नसल्याने विशेष अधिकार वापरुन ही निवड होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी आधीच पदावर हक्क सांगण्याचे संकेत दिले होते.

