“असहिष्णुता आपण आपल्यात जोपासली पाहिजे. आपण सहनशील होता कामा नये. आपली ही फाल्तू सहनशीलता हिंदूंना खड्ड्यात टाकण्यात कारणीभूत ठरली आहे. आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही की तुम्ही सहिष्णू आहात”, असं कालीचरण महाराज म्हणाले.
“असहिष्णुता आपण आपल्यात जोपासली पाहिजे. आपण सहनशील होता कामा नये. आपली ही फाल्तू सहनशीलता हिंदूंना खड्ड्यात टाकण्यात कारणीभूत ठरली आहे. आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही की तुम्ही सहिष्णू आहात. हिंदू धर्म, श्रद्धास्थान, आपले महापुरुषांच्या बाबतीत, महान स्त्रियांच्या बाबतीत असहिष्णूच राहिला पाहिजे. त्यांचा आपण बिलकूल सहन करु नये”, अशी भूमिका कालीचरण महाराजांनी मांडली.
‘छत्रपतींचा आदर्श जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा’
“छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत. त्यांचं हिंदवी स्वराज्याचं जे स्वप्न आहे, संपूर्ण भारत अखंड हिंदू राष्ट्र झाला पाहिजे, इतकंच नव्हे तर संपूर्ण जगावर हिंदू साम्राज्याची स्थापना झाली पाहिजे. या स्वप्नपूर्तीसाठी सर्व हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे. त्यांचा आदर्श जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे”, असं कालीचरण महाराज म्हणाले.
“सगळ्या प्रकारचा सडलेला जातीयवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद, संप्रदायवाद, संघटनवाद तोडून सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या भगव्या ध्वाजाखाली फक्त हिंदू म्हणून एकत्र झालं पाहिजे तरंच हिंदू सुरक्षित राहू शकतात. भारत हिंदू राष्ट्र होऊ शकतो. याला सगळ्याचं मोठं विघ्न हे जातीवाद आहे”, असं मत कालीचरण महाराज यांनी मांडलं.
“सगळ्यांनी जगदंबेचा भंडारा घाला. सगळ्यांनी सोबत जेवण करा. सगळ्यांना मंदिरात जाण्याचा अधिकार असला पाहिजे. सर्वांना प्रेमपुर्वक सन्मानपूर्वक वागणूक असायला पाहिजे. हा सर्व जातीवाद हाणून पाडा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी व्हा. तरंच आपल्या आई-बहिणी सुरक्षित राहतील. गोमाता सुरक्षित राहील. आपला राष्ट्र सुरक्षित राहील”, असं कालीचरण महाराज म्हणाले.

