• Wed. Sep 23rd, 2026
अजितदादांना मोठा धक्का, माजी आमदाराचे अपघाती निधन, राजकीय वर्तुळात शोक

Tukaram Bidkar Passes Away: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचं अपघाती निधन झालं आहे.

Lipi

प्रियंका जाधव, अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिडकर यांचं निधन झाल्याची माहिती आहे. अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ते गुरुवारी (१३ फेब्रुवारी) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परतत होते. तेव्हा शिवर येथे त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

एका पिकअप गाडीने तुकाराम बिडकर यांच्या दुचाकीला धडक दिल्याने तुकाराम बिडकर आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र राजदत्त मानकर या दोघांना मोठी दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या मित्राबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडाआणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed