• Tue. Jun 16th, 2026

    ‘हिंमत असेल तर फोडाफोडी करुन दाखवा’, उद्धव ठाकरे यांचं एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज

    ‘हिंमत असेल तर फोडाफोडी करुन दाखवा’, उद्धव ठाकरे यांचं एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज

    “पुण्यात जीबीएस आजार पसरतोय. कशामुळे पसरतोय तर दुषित पाणी. कोण जबाबदार? उत्तर कोण देतंय? महापालिका विसर्जित झाली. महापौर नाही. पण नगरविकास खात्यात जे बसले आहेत त्यांना जाब विचारा, काही मिळालं नाही तर गावात जावून बसतो आणि रेडा कापतोस”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : “हिंमत असेल तर फोडाफोडी करुन दाखवा”, असं चॅलेंज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. “आमचा अंत पाहू नका. फोडाफोडीत तुमचंच डोकं कधीतरी फुटेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “सरकारी यंत्रणा बाजूला ठेवून आमच्यातले फोडून दाखवा”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा ‘लाचार सेना’ म्हणत निशाणा साधला. “आज सकाळी एक बातमी एकदम सोडून दिली होती की, शिवसेनेचे सात-आठ खासदार फुटणार. बघाना, हिंमत असेल तर फोडून दाखवा. पण आता शिवसैनिकांच्या संयमाचा अंत बघू नका. कारण फोडाफोडी करायला लागलात तरी तुमचं डोकं फुटेल. माझं तर आव्हान आहे, फोडाफोडी करायचं असेल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा, पोलीस, ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स बाजूला ठेवा आणि हिंमत असेल मर्दाची अवलाद असशील तर माझा एक तरी शिवसैनिक फोडून दाखव”, असं चॅलेंज उद्धव ठाकरे यांनी दिलं.

    “23 जानेवारीच्या सभेत बोललो होतो की, हे जे लाचार सेनेचे प्रमुख नेते आहेत, लाचार सेनाच आहे, नेता कसा असला पाहिजे, त्याच्याकडे बघितलं की प्रेरणा आली पाहिजे, हे कुठले नेते? डोकं नाहीच आहे, मग दाढी खाजवायची. त्यांच्याकडे बघून कुणाला प्रेरणा मिळत असेल तर जा बाबा तुझं भलं होवो. पण प्रत्येक वेळेला काही झालं की रुसूरुसू बाई रुसूरुसू गावात जाऊन बसू”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली.

    ‘त्या काळोखात काय चेंगराचेंगरी होईल’

    “मिंध्यांचं आयुष्य जे आहे, अरे काजवा जरी चिमुटभर असला तरी स्वयंप्रकाशित असतो, हे स्वयंप्रकाशित कुठे यांच्यावर दिल्लीतून टॉर्च पडतोय तोपर्यंत ते दिसताय. दिल्लीतून टॉर्च बंद झाला की, मग अंधारात कुठे जातील कळत नाही. मग त्यांच्याबरोबर जे गेलेले आहेत त्या काळोखात काय चेंगराचेंगरी होईल काय कळणार नाही. त्यांचं भवितव्य फार बिकट आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
    Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे परत घेणार? अजित पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती

    ‘काही मिळालं नाही तर गावात जावून बसतो आणि रेडा कापतोस’

    “पुण्यात जीबीएस आजार पसरतोय. कशामुळे पसरतोय तर दुषित पाणी. कोण जबाबदार? उत्तर कोण देतंय? महापालिका विसर्जित झाली. महापौर नाही. पण नगरविकास खात्यात जे बसले आहेत त्यांना जाब विचारा, काही मिळालं नाही तर गावात जावून बसतो आणि रेडा कापतोस. पुणेकरांना दुषित पाण्यातून रोग होतोय. जबाबदार कोण?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed