• Sun. Mar 15th, 2026
    ‘काळी जादू काय असते ठाकरेंना विचारा, ‘वर्षा’ सोडताना बंगल्यावर टोपलीभर लिंबं सापडलेली’

    Ramdas Kadam on Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी त्याला प्रत्युत्तर दिले

    महाराष्ट्र टाइम्स

    रत्नागिरी : ‘दिवा विझताना जसा फडफडतो, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांची फडफड सुरू आहे,’ अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी रविवारी केली. त्याचवेळी ‘राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा उद्धव ठाकरे यांचा जीव मुंबई महानगरपालिकेत अडकला आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

    संजय राऊत यांच्यावरही कदम यांनी टीका केली. राऊत यांनी केलेल्या काळ्या जादूसंदर्भातील टीकेला उत्तर देताना काळी जादू काय असते, हे उद्धव ठाकरेंनाच विचारा, वर्षा बंगला सोडला तेव्हा बंगल्यावर टोपलीभर लिंबं सापडली होती, या एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचीही आठवण कदम यांनी यावेळी करून दिली.
    Uddhav Thackeray : ठाकरे-शिंदे आजही एकत्र येऊ शकतात, शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, मनाला यातना होतात, आदित्य ठाकरे मात्र…

    संजय राऊत यांना प्रत्युत्तर

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी रामदास कदम म्हणाले की, ‘काही लोकांना ऐकू येत नसेल. काही लोकांचे डोळे बंद असतील, काहींचे कान बंद असतील. झोपलेल्यांना जागे करू शकतो. परंतु झोपण्याचे सोंग घेतलेल्यांना जागे करू शकत नाही. ‘सामना’तील बातम्या झोपेचं सोंग घेऊन केलेल्या बातम्या आहेत. त्यात तथ्य नाही. शिवसेना कधीच फुटणार नाही. प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघात कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी गेला आहे. पुन्हा आमदार निवडून आणले आहेत. सर्व आमदार एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीर उभे आहेत,’ असे कदम म्हणाले.

    Uddhav Thackeray : काळी जादू ठाकरेंना विचारा, ‘वर्षा’ सोडताना बंगल्यावर टोपलीभर लिंबं सापडलेली; सेना नेत्याचा बोचरा वार

    Prakash Gajbhiye : पवारांचा शिलेदार जम्मूत बर्फावरुन घसरला, कोमात गेला; फडणवीसांनी २० लाख खर्च केले, मुंबईला एअरलिफ्ट

    २० आमदारांना थांबवण्याचे प्रयत्न

    ‘काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. २० आमदार थांबावेत म्हणून हे सगळे सुरू आहे. हा बलिशपणा आहे शिवसेना भाजपमध्ये मतभेद कसे होतील ? यासाठी काम संजय राऊत करत आहेत. शिवसेना भाजपमध्ये मतभेद निर्माण करून त्यांना आपली राजकीय पोळी भाजायची आहे. आमची आणि भाजपची युती आहे. आमदारांमध्ये मतभेद आणि चलबिचल निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,’ असे कदम म्हणाले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *