• Sun. Jan 19th, 2025

    ‘धनंजय मुंडे….आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा’; अंजली दमानियांच्या ट्विटने खळबळ, काय कारण?

    ‘धनंजय मुंडे….आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा’; अंजली दमानियांच्या ट्विटने खळबळ,  काय कारण?

    धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद मिळाले नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे. चार बीड आमदारांनी त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, त्यातील एक अंजली दमानिया. राष्ट्रवादी काँग्रेलच्या अधिवेशनात नवाब मलिक यांनी पक्षाच्या हितासाठी निर्णय घेण्याची गरज सांगितली, मुंडेंवर प्रकरणाचा परिणाम स्पष्ट केला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्रिपदाचा विस्तार रखडला होता. शनिवारी रात्री पालकमंत्र्यांची घोषणी करण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळाले नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद मिळाले नाही. बीड जिल्ह्यामधील चार स्थाानिक आमदारांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यामध्ये महायुतीमधील आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. त्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावरून मुंडेंवर निशाणा साधत आहेत. अशातच अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा ट्विट करत धनंजय मुंडे यांना राजीनाम्याची तयारी करायाला लावली आहे.

    अंजली दमानिया काय म्हणाल्या?

    धनंजय मुंडे, बीडची मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराडने केली, सुदर्शन घुलेने केली, विष्णू चाटेने केली. संतोष देशमुख सारख्या निष्पाप माणसाच्या निर्घृण हत्येने… जाऊ द्या बोलवत नाही. बीड जिल्ह्यातील दहशत संपवून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्याच पक्षातील लोक आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या बीड बद्दल काय म्हणाली वाचा, “राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्व यांची बदनामी होतं आहे’. ‘याप्रकरणी लवकरात लवकर पक्ष नेतृत्व यांनी पक्षाचा हिताचा विचार करता निर्णय घ्यायला हवा. ‘आगामी निवडणुकांसाठी आशा प्रकारची बदनामी होण पक्ष हिताच नाही” आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा, असं अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेल पक्षाचे शिर्डी येथे अधिवेशन सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडालीये. एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत आहे. लवकरात लवकर पक्षाच्या हिताचा निर्णय घ्यावा, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. मलिकांच्या वक्तव्याचा संबंध धनंजय मुंडेंसोबत जोडला जात आहे. मलिकांच्या वक्तव्याचा धागा पकडत अंजली दमानिया धनंजय मुंडेंवर निशाणा साधत राजीनामा तयार ठेवायला लावला आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed