Walmik Karad Supporter Agitation : वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी आण्णाला अडकवलं जात असल्याचं म्हणत, आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे वापस घ्या, समर्थकांची घोषणाबाजी
बीडच्या जिल्हा न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला बुधवारी हजर करण्यात आले होते. त्यादरम्यान त्यांना सात दिवसाचा पीसीआर देखील मिळाला आणि त्यानंतर कोर्टाबाहेर जात असताना त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे वापस घ्या आणि पोलिसांची दादागिरी नही चलेगी, नही चलेगी अशा घोषणा दिल्या. या सगळ्या प्रकरणानंतर कोर्ट परिसरातील वातावरण चिघळल्याचं पाहायला मिळालं. वाल्मिक कराड समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Walmik Karad : वाल्मिक कराडचं पिंपरी चिंचवड कनेक्शन, सव्वा तीन कोटींचा 4 BHK; आता लिलाव होणार
आमच्या आण्णाला अडकवलं आहे आणि अडकवत आहेत…
कराडला पोलीस कोठडी झाल्यानंतर महिलांनी पांगरीत आंदोलन केलं. आमच्या आण्णाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन सोडणार नाही. आम्हाला खरा न्याय हवा आहे, आम्हाला खोटा न्याय मागत नाही, आमच्या आण्णाला अडकवलं आहे आणि अडकवत आहेत. म्हणून आम्ही आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही. आण्णाला न्याय मिळालाच पाहिजे असं सांगत वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं. याआधीही कराडच्या समर्थकांनी अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता.
आण्णाला अडकवलं, आम्ही आत्मदहन करणार; वाल्मिक कराडला पोलीस कोठडी, समर्थकांचा कोर्टाबाहेर राडा
वाल्मीक कराडला फाशी द्या, कोर्टाबाहेर घोषणा
प्रत्येक गोष्टीला पारदर्शकता असली पाहिजे, सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी सरपंचांच्या हत्येनंतर केली जात आहे. बीड जिल्ह्यात गृहमंत्र्यांनी यावं, अशीही मागणी होत आहे. वकील हेमा पिंपळे या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला नेत्या आहेत. त्यांनी कोर्टाबाहेर आंदोलन करत ही मागणी केली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बीडच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी वाल्मीक कराड कोर्टामधून बाहेर जात असताना घोषणाबाजी केली. आरोपींना फाशी द्या अशा त्यांनी घोषणा दिल्या आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तसंच शिवसंग्राम संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्या देखील या घोषणाबाजीमध्ये सहभागी होत्या.