• Sun. Jun 14th, 2026
    मनसेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश, ‘दरोडेखोरांचे राज्य उलथून टाकायचेय’, ठाकरेंचं आवाहन

    Uddhav Thackeray on Election Result: त्यांचाच विजयावर विश्वास बसत नाही. या विजयात घोटाळा आहे. सगळे जिंकल्यानंतर येतात. हरल्यानंतर कुणी येत नाही. पण पराभवाची ज्याला खंत असते व पराभव ज्याचा जिव्हारी लागतो. तोच इतिहास घडवू शकतो.

    हायलाइट्स:

    • मनसेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश
    • ‘दरोडेखोरांचे राज्य उलथून टाकायचेय’
    • उद्धव ठाकरेंचं मातोश्रीवर आवाहन
    महाराष्ट्र टाइम्स
    उद्धव ठाकरे ऑन निवडणूक निकाल

    मुंबई :‘पराभवांची ज्याला खंत असते व पराभव ज्यांच्या जिव्हारी लागतो, तोच इतिहास घडवू शकतो. उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. हे चोरांचे, दरोडेखोरांचे सत्तेत आलेले राज्य आपल्याला उलथून टाकायचे आहे’, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. घाटकोपर पूर्व विधानसभेतील मनसेचे पदाधिकारी संतोष पिंगळे, सुनील भोस्तेकर, सतीश पवार आणि राहुल चोरगे यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला.
    मारकडवाडीची राज्यभर चर्चा सुरू असताना एका गावात चोख बंदोबस्तात बॅलेट पेपरवर मतदान, मतदारांचा दणदणीत विजय

    ‘काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्या निकालानंतरही तुम्ही शिवसेनेत जल्लोषात येत आहात. जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोषच नाही. याचा अर्थ त्यांचाच विजयावर विश्वास बसत नाही. या विजयात घोटाळा आहे. सगळे जिंकल्यानंतर येतात. हरल्यानंतर कुणी येत नाही. पण पराभवाची ज्याला खंत असते व पराभव ज्याचा जिव्हारी लागतो. तोच इतिहास घडवू शकतो. उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे’, असा निर्धार ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. ‘संपूर्ण मुंबई यांनी बरबटून टाकली आहे. एक हैं ते सेफ है, असे म्हणतात, मग मला आता मराठी माणसाला प्रश्न विचारायचा आहे की, आपल्या हक्काची मुंबई आपल्या डोळ्यादेखत ओरबाडून नेली जात आहे. अशावेळी बघत बसणार आहे का’, असा प्रश्नही त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.

    ‘निवडणूक पद्धतीत बदल करावा’

    ‘सरकारने निवडणूक पद्धतीत बदल करून निवडणुकीविषयी लोकांच्या मनात असलेली शंका काढून टाकायला हवी,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे संवाद मेळाव्यात रविवारी व्यक्त केले.

    ‘लोकशाही प्रणालीतील सरकारच संविधानाने दिलेले लोकांचे अधिकार पायदळी तुडवत आहे. निवडणूक आयोग मतदारांचे म्हणणे एकूण घेत नाही. पोलिस तुमच्याच गावात तुम्हालाच जमावबंदी करताहेत. या देशात हे चाललेय काय,’ असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. विधानसभा निवडणुकीचा निकाल नाकारून मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेण्याची तयारी केली होती. प्रशासनाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास परवानगी दिली नाही. या पार्श्वभूमीवर संवाद मेळाव्यासाठी रविवारी शरद पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मारकडवाडीला आले होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, आदी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed