• Thu. Dec 26th, 2024
    शरद पवारांकडून रोहित पाटलांवर मोठी जबाबदारी; आबांच्या लेकाच्या नावावर मोठा विक्रम

    Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्कराव्या लागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षानं आता विधिमंडळातील नेत्यांची निवड केलेली आहे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झालेल्या रोहित पाटील यांच्यावर शरद पवारांनी मोठी जबाबदारी दिलेली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्कराव्या लागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षानं आता विधिमंडळातील नेत्यांची निवड केलेली आहे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झालेल्या रोहित पाटील यांच्यावर शरद पवारांनी मोठी जबाबदारी दिलेली आहे. रोहित पाटील यांच्याकडे पक्षाचं प्रमुख प्रतोदपद देण्यात आलेलं आहे. ते सर्वात तरुण प्रतोद ठरले आहेत. त्यामुळे विधानसभेत एन्ट्री घेणाऱ्या रोहित पाटील यांनी संसदीय कारकिर्दीची सुरुवात करताच स्वत:च्या नावावर केला आहे.

    सांगलीतील तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातून रोहित पाटील विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. वयाच्या २५ व्या वर्षी ते आमदार झाले. आता पक्षानं त्यांच्याकडे प्रमुख प्रतोदपद सोपवलं आहे. त्यांच्या सोबत उत्तमराव जानकर यांची प्रतोद पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ते माळशिरस मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
    Avinash Jadhav: निवडणुकीत मनसेचा पालापाचोळा; राज ठाकरेंच्या डॅशिंग नेत्याचा राजीनामा; पराभव जिव्हारी
    शरद पवारांचे विश्वासू, निष्ठावंत अशी ओळख असणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांची पक्षानं विधानसभेचे गटनेते म्हणून निवड केली आहे. ते मुंब्रा-कळवा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेले आहेत. विधिमंडळ नेत्याची निवड पक्षाकडून करण्यात आलेली नाही. ती काही दिवसांनी करण्यात येईल, असं सांगण्यात आलेलं आहे. विधिमंडळातील नेत्यांच्या घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

    रोहित पाटील देशातील सर्वात तरुण प्रतोद
    वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील आता देशातील सर्वात तरुण मुख्य प्रतोद ठरले आहेत. २००० मध्ये केरळच्या विधानसभेत काँग्रेसनं एन. चंद्रशेखरन यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड केली होती. त्यावेळी चंद्रशेखरन अवघ्या २७ वर्षांचे होते. चंद्रशेखरन यांच्या नावे सर्वात तरुण मुख्य प्रतोद असा विक्रम झाला. रोहित पाटलांच्या निवडीनं तो विक्रम मोडला गेला आहे. ते केवळ २५ व्या वर्षी विधानसभेतील मुख्य प्रतोद झाले आहेत. विधानसभेचं सदस्य होण्यासाठी किमान वयाची अट २५ वर्ष इतकी आहे.
    Eknath Shinde: शिवसेनेला हवा नैसर्गिक न्याय! फडणवीस पॅटर्नची मागणी; भाजपच्या त्यागाला लहान भावाकडून काऊंटर
    शरद पवारांच्या पक्षाची विधानसभेत धूळधाण
    लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षानं १० जागा लढवत ८ जागांवर विजय मिळवला. तेव्हा पक्षाच्या स्ट्राईक रेटची बरीच चर्चा झाली. त्यामुळे विधानसभेत पक्ष काय करणार यावर चर्चा सुरु होती. पण महायुतीसमोर पक्षाचा टिकाव लागला आहे. शरद पवारांचे केवळ १० उमेदवारच विजयी झाले. महाविकास आघाडीतील मुख्य पक्षांचा विचार करता पवारांचे सर्वात कमी उमेदवार विजयी झाले आहेत.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed