• Thu. Nov 28th, 2024
    खूप अभिमान वाटतो बाबा… श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंसाठी डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

    Shrikant Shinde Post For Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी वडिलांसाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ आता संपला आहे. गेले अडीच वर्ष त्यांनी हे पद सांभाळलं. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. गेल्या अडीच वर्षात जनतेने भरभरुन प्रेम दिलं, मी कधीही स्वत:ला मुख्यमंत्री समजलं नसून एक सामान्य व्यक्ती समजलं आणि म्हणून मी सामान्य लोकांमध्ये जाऊ शकलो असंही ते म्हणाले. तसेच, जनतेतला मुख्यमंत्रि म्हणून ओळख मिळायला नशीब लागतं असं म्हणत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    त्यानंतर मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक भावूक करणारी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी आपल्याला आपल्या बाबाचा खूप अभिमान वाटतो, असं म्हटलं आहे.
    Eknath Shinde: माझ्यामुळे सत्ता स्थापनेत कुठलीही अडचण नाही, मोदींना फोन; शिंदे म्हणाले – भाजपचा निर्णय मान्य

    श्रीकांत शिंदे यांची पोस्ट

    मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.

    कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.

    Shrikant Shinde: खूप अभिमान वाटतो बाबा… श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंसाठी डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

    सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे.

    खूप अभिमान वाटतो बाबा!

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed