• Thu. Nov 14th, 2024
    गद्दारी करणाऱ्या गणोजीला आता सुट्टी नाही! वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात पवारांचा कडक इशारा

    Sharad Pawar: गणोजीला आता सुट्टी नाही, ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही, अशा कडक शब्दांत शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना इशारा दिला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : साडे तीनशे वर्षांपूर्वी गणोजी शिर्केने छत्रपती संभाजी महाराजांशी गद्दारी केली, ती गद्दारी अद्यापही महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळे गणोजीला आता सुट्टी नाही, ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही, अशा कडक शब्दांत शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना इशारा दिला. पवार यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

    मंचर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार यांनी हा इशारा दिला. ज्यांना पद, शक्ती आणि अधिकार दिले, तेच गद्दार झाले. आता या विधानसभा निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना शंभर टक्के पराभूत करा, करा, करा, असं आवाहन शरद पवारांनी आंबेगावातील सभेतून केलं. या सभेला हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
    मतदानाला उरला आठवडा, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची मोठी घोषणा; थेट यादीच वाचली, ठाकरेंची गोची?
    यावेळी शरद पवार म्हणाले की, मी दिलीप वळसे पाटील यांना संधी दिली. आमदार केलं, मंत्री केलं. विधानसभेचं अध्यक्ष केलं. मात्र त्यांनी विचाराशी गद्दारी केली आणि आमची साथ सोडली. जो गद्दारी करतो, त्याला माफी नसते, असं म्हणत त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत वळसे पाटील यांना धडा शिकवा, त्यांना पराभूत करा, असं आवाहन त्यांनी आंबेगावच्या नागरिकांना केलं.

    ‘स्वर्गीय दत्तात्रय वळसे पाटील यांनी मला साथ दिली. ते कायम माझ्या सोबत राहिले. तसंच त्यांच्या मुलाला माझ्या सोबत काम करण्याची इच्छा होती. मला पण काम करणारी माणसं हवी होती. त्यामुळे मी दिलीप वळसे पाटलांची निवड केली आणि ते माझ्यासोबत आले. त्यांनी सर्व कामं शिकून घेतली. त्यांना मी संधी दिली, सर्व दिलं. एवढं सगळं काही देऊनही या माणसानं साथ सोडण्याची भूमिका घेतली. त्यांनी आमची साथ सोडली हे लोकांना आवडलं नाही, ते आज सांगत असतील की आम्ही पवारसाहेबांना मानतो तर त्यात काही तथ्य नाही, असं पवार यांनी ठणकावून सांगितलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed