• Sat. Sep 21st, 2024
ज्यांची दुश्मनी, त्यांच्यावरच लीड देण्याची जबाबदारी, चतुर फडणवीसांचे बेरजेचे डावपेच

म. टा. वृत्तसेवा, बदलापूर : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना, गेल्या काही दिवसांत कपिल पाटील आणि कथोरे यांच्यात वादाचे खटके आणि आरोप-प्रत्यारोप सुरू होते. मात्र, आता आमदार किसन कथोरे यांच्यावरच कपिल पाटील यांना मताधिक्य मिळवून देत त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर व्यासपीठावरून दिली आहे. नुकत्याच बदलापूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत फडणवीस यांनी मुरबाडमधून कपिल पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्याची सूचनाच कथोरे यांना केल्याने कपिल पाटील यांचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे.महाराष्ट्रासह मुंबई आणि उपनगरांत मविआ, महायुतीच्या नेत्यांकडून लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यात कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाला २० मेपर्यंत अवकाश असला, तरी येथील दोन्ही उमेदवारांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र, भिवंडी आणि मुरबाड या दोन्ही मतदारसंघात दिग्गज नेते म्हणून परिचित असलेले खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.
शिवसेनेला कडीपत्त्याप्रमाणे बाहेर टाकणाऱ्या कपिल पाटलांना मदत करणार नाही, शिंदेंचे कार्यकर्ते आक्रमक

त्यातही लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कपिल पाटील यांनी कथोरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने या वादावर पडदा पडल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यानंतर पुन्हा या दोन्ही नेत्यांमध्ये वादाचे खटके उडाल्याचे समोर आले होते. त्यामुळे कथोरे समर्थकांच्या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकी कपिल पाटील यांना बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
भिवंडी शरद पवारांनी खेचली, शिंदे गटातून आलेल्या बाळ्यामामांना तिकीट, काँग्रेसची नाराजी वाढली

याच दरम्यान गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बदलापूर येथील कथोरे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि महायुतीच्या जाहीर सभेसाठी देवेंद्र फडणवीस बदलापुरात आले होते. यावेळी कथोरेंच्या कार्यालयात फडणवीस, कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यात चर्चा झाली असून, या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमधील वादात फडणवीसांनी मध्यस्थी केल्याचे समजते.
सेना-भाजप वादावर पडदा, श्रीकांत शिंदेंना निवडून आणा, गणपत गायकवाड यांचे कार्यकर्त्यांना आदेश

तसेच व्यासपीठावरून कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ फडणवीस यांनी भिवंडी मतदारसंघातून मिळणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीबाबत बोलताना, मुरबाड मतदारसंघातून कपिल पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल असे सांगत किसन कथोरे यांना सूचना करत एक प्रकारे कपिल पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारीच फडणवीस यांनी कथोरेंवर सोपवली आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाळ्यामामांची कपिल पाटलांवर सडकून टीका, कार्यकर्त्यांचा जल्लोष

त्यामुळे कल्याण ग्रामीण आणि मुरबाड तालुक्यातील कथोरेंचा दांडगा जनसंपर्क पाहता, तसेच दोन्ही नेत्यांमधील वादात निवडणुकीत मतदानाच्या टक्क्यावर कुठलाही परिणाम होऊ नये यासाठीच फडणवीसांच्या माध्यमातून कपिल पाटील यांनी आपला विजयाचा मार्ग अधिक सुकर केल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed