• Sat. Sep 19th, 2026

राजधानीत यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

ByMH LIVE NEWS

Mar 12, 2024
राजधानीत यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, दि. १२: संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांनी यशवंतराव चव्हाणांच्या प्रतिमेस तसेच, कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम व स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आज यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहीली. उपस्थित कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed