• Sun. Mar 8th, 2026
    शिंदे गटाच्या आमदारांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; नऊ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

    यवतमाळ: भंडाऱ्याचे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या ताफ्यातील वाहनाने ऑटो आणि दुचाकीला धडक दिली. शुक्रवारी रात्री साडेसात वाजता दिग्रसजवळ झालेल्या या अपघातात नऊ जण जखमी झाले. आमदार भोंडेकर हे दिग्रसला स्वीय सहाय्यकाच्या घरी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते.
    जखमी पुतण्याला पाहण्यासाठी काका-काकू निघाले; वाटेतच अनर्थ, पत्नीच्या मृत्यूनं पतीचा मन हेलावणारा आक्रोश
    कार्यक्रमानंतर परत भंडाऱ्याला जात असताना त्यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनावर बैलगाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ऑटो धडकला. नंतर समोरून येणारी दुचाकीही धडकली. या अपघातात दुचाकीवरील गजानन जकाते (५०) रा. दिग्रस, उमेश राजू मनवर (वय ३०) रा. चिंचोली हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालय यवतमाळला हलविण्यात आले आहे.

    राजकारणात एन्ट्रीची महत्त्वाकांक्षा, पण त्याआधीच खेळ खल्लास; मोहोळला संपवणारा सूत्रधार सापडला

    ऑटोमधील जखमींमध्ये सै.जावेद सै. ताजुद्दीन (३८), सलमा परवीन (२४), अफसाना बी. मो. जमीर (६०), प्रतिक ब्रम्हा मोरे (२०), सुरेखा गजानन बोरकर (३०), अनस खान वाजीद खान (१२), तोहीद खान वाजीद खान (८) सर्व रा. दिग्रस यांचा समावेश आहे. या सर्वांना दिग्रसच्या रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर रात्री उशिरा यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती दिग्रस पोलिसांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed