• Sat. Sep 21st, 2024

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलच्या मालकानं मटणाचं ६१ लाख रुपयांचं बिल थकवलं, प्रकरण पोलिसांत

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलच्या मालकानं मटणाचं ६१ लाख रुपयांचं बिल थकवलं, प्रकरण पोलिसांत

पुणे: हॉटेलचा व्यवसाय म्हटलं की तिथे वेंडरकडून आगाऊ माल घेऊन त्याची रक्कम नंतर परत करण्याची प्रथा ही सगळीकडे कायम चालत आली आहे. मात्र, पुण्यात एक अजब प्रकार घडला. आगाऊ रक्कम किती असावी हा आकडा ऐकून तुम्हाला ही आश्चर्याचा धक्का बसेल, पुण्यातील प्रसिद्ध बागबान हॉटेलच्या मालकाने तब्ब्ल ६१ लाख रुपयेची मटणाची उधारी थकीत ठेवली आहे. हा प्रकार २०१९ ते २०२३ या कालावधीत पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी मार्केट येथे घडला आहे. वारंवार पाठपुरावा करून देखील पैसे परत दिले नसल्याने हॉटेल मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

याबाबत शादाफ निजाम पटेल (वय ४३ रा. जान मोहम्मद स्ट्रीट, पुणे कॅम्प) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन बागबान हॉटेलचे मालक अफजल युसूफ बागवान (वय-६५ रा. कौसरबाग, कोंढवा), अहतेशाम अयाज बागवान (वय-३४) यांच्यावर आयपीसी ४०६, ४२०, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मटण विक्रीचा व्यवसाय आहे. बागबान हॉटेलच्या मालकाचे फिर्यादी सोबत गेले ३ वर्षांपासून व्यवहार सुरू होते. आणि हॉटेलच्या व्यवसायामध्ये वेंडरकडून आगाऊ मटण घेण्याची पद्धत सगळीकडे चालत असते. त्यानुसार, बागबान हॉटेलच्या मालकाने २ कोटी ९१ लाख ८१ हजार, ८१५ रुपयांचे मटण आणि मटण मधील विवीध प्रकारचा हॉटेल मालकाला पुरवठा केला. मात्र, त्यापैकी २ कोटी, ३० लाख, १९ हजार, ६८५ रुपये हॉटेल मालकाने फिर्यादीला परत केले. मात्र, उर्वरित ६१ लाख, ६२ हजार १४० रुपये थकीत ठेवले. वारंवार पाठपुरावा करूनही आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानुसार, फिर्यादी यांनी लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास लष्कर पोलिस करत आहे.

पोपट दे, तरच घटस्फोट…, पुण्यातील पती-पत्नीच्या प्रकरणाने सारे हैराण
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed