• Wed. Sep 23rd, 2026

मुंबई शहर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी विद्यावेतनासाठी ११ ऑक्टोबरपासून अर्ज करण्याचे आवाहन

ByMH LIVE NEWS

Nov 1, 2023
मुंबई शहर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी विद्यावेतनासाठी ११ ऑक्टोबरपासून अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि. १ : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना, राज्य शासनाची शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या मुला-मुलींना निर्वाह भत्ता (विद्यावेतन) इ. योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ साठीचे अर्ज https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Login या महाडीबीटीपोर्टलवर ११ ऑक्टोबरपासून भरता येत असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी दिली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी मुंबई शहरातील शिक्षणक्रमात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी यांनी अचूक अर्ज भरावेत तसेच सर्व प्राचार्य, कर्मचारी यांनीही शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक व तत्काळ सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed