• Thu. Mar 12th, 2026

    मराठा आरक्षण लढ्याची दिशा २४ तारखेला जाहीर करणार, मनोज जरांगेंची सरकारकडे मोठी मागणी

    मराठा आरक्षण लढ्याची दिशा २४ तारखेला जाहीर करणार, मनोज जरांगेंची सरकारकडे मोठी मागणी

    पुणे : मनोज जरांगे यांची पुण्यातील राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगे यांची सभा सुरु होती. या सभेत जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन कायदा मंजूर करावा, अशी मागणी केली. सरकारला पाच हजार पुरावे दिलेत, असं देखील जरांगे म्हणाले. मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या संदर्भातील पुढील दिशा मांडत असताना एका युवकानं मंचावर येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सभा संपल्यानंतर त्या युवकाशी चर्चा करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

    या सभेदरम्यान मनोज जरांगे यांनी गेल्या महिना दीड महिन्यात १४ ते १५ मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. यापूर्वी देखील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या. त्यांच्या कुटुंबांना मराठा समाज काही कमी पडू देणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजाचं दु:ख आणि वेदना सहन होत नाही त्यामुळं गावोगावी जाऊन मराठा माता भगिनींचे आशीर्वाद घेत आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

    मराठा आरक्षणाचं आंदोलन शांततेच्या मार्गानं सुरु आहे. शांततेच्या मार्गानं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं हा शब्द आहे. त्या शब्दापासून मागं हटणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. मी शेतकऱ्याचा मुलगा असून शब्द दिला की त्यापासून मागं फिरत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
    विराट कोहली शतकासाठी स्वार्थी झाला होता का, लोकेश राहुलने सामन्यानंतर सांगितलं सत्य…
    माझ्या समाजाला आई बाप मानतो, समाजाशी गद्दारी करणार नाही. मी एकदा शब्द दिला की बदलत नाही. आपण मोर्चे खूप काढले, सभा घेतल्या पण घराघरातील लोकांनी आरक्षण समजून घेतलं नाही. मोर्चे काढले आणि सभा घेतल्या पण आरक्षण मिळालं नाही. आरक्षण समजून घेणं त्याच्या मुळाशी जाणं महत्त्वाचं होतं, असं मनोज जरांगे म्हणाले.
    Devendra Fadnavis: ललित पाटील प्रकरणात फडणवीसांचा गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंसोबतच्या कनेक्शनबाबत खळबळजनक दावा

    मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत या मागणीसाठी आंदोलन सुरु झालं. आपण कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली आहे. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का यावर काहीच उत्तर दिलं जात नाही. कुणबी या शब्दाचा सुधारित अर्थ शेती असा असल्याचं जरांगे म्हणाले.
    मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ओव्हरस्पीडिंग प्रकरणी रोहित शर्मावर मोठी कारवाई; झाला इतक्या रुपयांचा दंडRead Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *