• Mon. Nov 25th, 2024
    महिला पोलिसाने भावाला दिली पतीची सुपारी, हाणामारी झाली अन्…; पुढे जे घडलं ते धक्कादायक

    सातारा : वडगाव (ता.माण) इथे राहणाऱ्या अतुल ओंबासे यांना मारहाण करणाऱ्या वडूज पोलीस स्टेशन निर्भया पथकाच्या महिला पोलीस राणी खाडे-ओंबासे यांनी चक्क आपल्या पतीलाच मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

    या प्रकरणी सासूने दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मारहाण करणाऱ्या राणी खाडे-ओंबासे यांच्या भावाविरोधात विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राणी खाडे-ओंबासे यांचा भाऊ प्रमोद खाडे याने घरात घुसून अतुल ओंबासे यांना मारहाण केली. यावरून अतुल ओंबासे यांच्या आईने फिर्याद नोंदवली आहे. मारहाण होत असताना फिर्यादीने प्रमोद खाडे याला अडवले असता धमकी देत, शिवीगाळ करत गळ्यातील बोरमाळ व मणी तोडून घेतले.

    Maharashtra Rain Alert : राज्यात पुढचे काही तास महत्त्वाचे, मुंबई, ठाण्यासह १३ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
    कानाखाली मारून फिर्यादीची साडी ओढून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावरून प्रमोद खाडे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच प्रमोद खाडे व राणी खाडे-ओंबासे यांच्यासोबत आलेल्या चार ते पाच जणांनी अतुल ओंबासे यांना दगड आणि लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केले. तसेच नातू प्रभास यास घेऊन गेले.

    फिर्यादीची सून राणी खाडे-ओंबासे यांनीही स्वतःच्या पतीस अतुल ओंबासे यास ‘मी तुझा खून करण्यासाठी आली आहे’, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. या एकंदरीत प्रकारावरून दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे या करत आहेत.

    मुंबईतला अडीच कोटींचा 1BHK फ्लॅट पाहून तुम्हाला धक्का बसेल, मुलाने काढलेला VIDEO नक्की पाहा….

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *