• Sun. Jul 5th, 2026

    राजधानीत सद्भावना दिनानिमित्त राजीव गांधी यांना अभिवादन

    ByMH LIVE NEWS

    Aug 18, 2023
    राजधानीत सद्भावना दिनानिमित्त राजीव गांधी यांना अभिवादन

    नवी दिल्ली, १८ : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग  यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावनादिनाची शपथ दिली. यावेळी श्री रुपिंदर सिंग यांनी दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी सदनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

    महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा

    महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती)अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. श्रीमती अरोरा यांनी यावेळी दिवंगत राजीव गांधी यांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed