• Sat. Sep 21st, 2024

NIAची मालेगावात मोठी कारवाई; पीएफआयशी संलग्न असलेल्या एका संशयितास घेतलं ताब्यात

NIAची मालेगावात मोठी कारवाई; पीएफआयशी संलग्न असलेल्या एका संशयितास घेतलं ताब्यात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक / मालेगाव : देशविघातक कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरुन ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांना सन २०२२ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने अटक केल्यानंतर सुरू असलेल्या तपासात ‘मालेगाव कनेक्शन’बाबत पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. याप्रकरणी ‘पीएफआय’चा कार्यकर्ता गुफरान खान (३३ रा. मोमीनपुरा, मालेगाव) याला रविवारी (दि. १३) पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेण्यात आले. चार तास त्याची चौकशी केल्यानंतर पुढील तपास सहकार्य करण्याची ताकीद देत संशयिताला सोडण्यात आले.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटना २२ सप्टेंबर २०२२ पासून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. त्यावेळी मालेगावातून एका मौलानासह राज्यात पाच जणांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी अधिक चौकशी व तपासकामी ‘एनआयए’ मुंबईचे पथक रविवारी पहाटे मालेगाव शहरात दाखल झाले. त्यांनी ‘पीएफआय’शी संबंधित संशयित गुफरान याला ताब्यात घेत मालेगाव शहर पोलिस ठाण्यात नेले. तिथे त्याची कसून चौकशी केल्यानंतर नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, गुफरानला वेळोवेळी तपासकामी ‘एनआयए’समोर हजर राहण्याची ताकीद देण्यात आली आहे. यासह त्याच्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
धक्कादायक! चालत्या ट्रकमधून महिलेला फेकले रस्त्यावर; ड्रायव्हर म्हणतो ती खाली उतरेनाच, काय घडलं?
कोण आहे गुफरान?

संशयित गुफरान हा मोमीनपुरा भागातील रहिवासी आहे. काही वर्षांपासून तो टेलरिंगचा व्यवसाय करीत आहे. तो पीएफआयमध्ये काम करीत असल्याचा संशय आहे. यासह या तपासाचे धागेदोरे इतर राज्यातील संशयितांपर्यंत आहे. गुफरान हा यापूर्वी अटक झालेला इमाम कौन्सिलचा अध्यक्ष मौलाना इरफान नदवी याचा निकटवर्तीय असल्याचे समजते.

…यापूर्वीचे संशयित

२२ सप्टेंबर २०२२ रोजी ‘पीएफआय’ या वादग्रस्त संघटनेचा मालेगाव जिल्हाध्यक्ष संशयित मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (वय २७, रा. हुडको कॉलनी) याला अटक झाली होती. २१ ऑक्टोबर रोजी संशयितांच्या मोबाइल डेटा नष्ट केल्याच्या आरोपात संशयित उनैस उमर हयाम पटेल (३२, रा. जळगाव) याला अटक झाली होती. तर, १४ नोव्हेंबरला ऑल इंडिया इमाम कौन्सिलचा राज्य अध्यक्ष इरफान दौलत खान नदवी (वय ३५, रा. गुलशेरनगर)याला ‘एनआयए’ने अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed