• Sat. Sep 21st, 2024

‘महावितरण’ची राज्यात ६२ चार्जिंग स्टेशन; पुण्यात सर्वाधिक स्टेशन, जाणून घ्या तुमच्या शहरात किती आहेत?

‘महावितरण’ची राज्यात ६२ चार्जिंग स्टेशन; पुण्यात सर्वाधिक स्टेशन, जाणून घ्या तुमच्या शहरात किती आहेत?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी ‘महावितरण’ने राज्यात ६२ चार्जिंग स्थानके उभारली असून, त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक २३ चार्जिंग स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवर चार्जिंग करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे.राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा उभारण्यास महावितरणला ‘नोडल एजन्सी’ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. इव्ही चार्जिंग स्थानके वाढविण्यासाठी महावितरणने स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. त्याद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे चार्जिंग स्थानक उभारण्यास चालना दिली जात असून, नव्या स्थानकांना सुलभ प्रक्रियेद्वारे तत्पर वीजजोडणी दिली जात आहे. याशिवाय महावितरणने ‘पॉवरअप ईव्ही’ हे मोबाइल ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. त्यातून इलेक्ट्रिक वाहनचालकांना जवळचे चार्जिंग स्थानक शोधणे, चार्जिंगसाठी लागणारा वेळ, वापरलेले वीज युनिट, व्यवहारासाठी वॉलेट व बॅलन्स आदी माहिती मिळत आहे, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

इव्ही चार्जिंग सुविधांसाठी महावितरणला पुरस्कार

इव्ही चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांच्या विकासात सर्वोत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल महावितरणला नवी दिल्ली येथे आयोजित ‘ईव्ही चार्ज इंडिया’ या परिषदेत पुरस्काराने गौरविण्यात आले. सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स संस्थेचे सरचिटणीस अजय शर्मा यांच्या हस्ते महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
जुने घर विकत घेताय? आधी पूर्वीचे वीजबिल तपासा अन्यथा…, वीजबिल थकबाकीबाबत महावितरणाचा नवा नियम
शहरनिहाय चार्जिंग स्टेशन
पुणे – २३,
ठाणे – ११
नवी मुंबई – १२,
नागपूर – ६
नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि सांगली शहरांत – प्रत्येकी १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed