• Fri. Sep 18th, 2026

विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ByMH LIVE NEWS

May 25, 2023
विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी, दि.२५ -:  रत्नागिरी येथील  शासकीय उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कौशल्य विकास वास्तूच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. मुख्यमंत्री शिंदे यांनीही कोणतेही सुरक्षा कारण न सांगता विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी काढले. त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

हाच प्रकार लोकमान्य टिळक स्मारक विभागीय शासकीय ग्रंथालयातही दिसून आला. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थिनींच्या आग्रहाखातर सेल्फी घेतले. विद्यार्थ्यांशी संवादही साधला. त्यामुळे उपस्थित विद्यार्थी आनंदात होते.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed