• Sat. Mar 7th, 2026

    नागपुरात धक्कादायक प्रकार; युवकाला तिघांनी २५ लाखांचा गंडा घातला, ठगांत महिलेचाही समावेश

    नागपुरात धक्कादायक प्रकार; युवकाला तिघांनी २५ लाखांचा गंडा घातला, ठगांत महिलेचाही समावेश

    नागपूर : गुंतवणूक केल्यास दोन दिवसांत सव्वा कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेसह तिघांनी युवकाला २५ लाखांनी गंडा घातला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून ठकबाजाला अटक केली.पराग दत्तात्रय मोहोड (वय ३०, रा. अवस्थीनगर, मानकापूर) असे अटकेतील तर परवेज पटेल (वय ४०, रा. हसनबाग) व कंचन गोसावी (वय ३०) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अन्य आरोपींची नावे आहेत. कंचन ही वकील असून, परवेज याचे नंदनवन परिसरात बिलाल ऑटो डिल्स नावाचे कार्यालय असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आकाश प्रमोद उमरे (वय २७, रा. लांजी, जि. बालाघाट, मध्य प्रदेश) याने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

    Elon Musk : एलन मस्कने या देशी तरुणासमोर टेकले गुडघे, १० हजार डॉलर देऊन करावी लागली सुटका
    नागपुरातील पराग हा गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देत असल्याची माहिती आकाशला त्याच्या मित्राच्या माध्यमातून मिळाली. फेब्रुवारीत आकाशने परागशी संपर्क साधला. त्याने आकाशला परवेजच्या कार्यालयात नेले. तेथे परवेजसोबत ओळख करून दिली. येथे कंचनही होती. तिघांनी आकाशला २५ लाखांची गुंतवणूक केल्यास दोन दिवसांत सव्वा कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखविले. आकाशने त्यांना २५ लाख रुपये दिले.

    डोंबिवलीत खळबळ! बहिणीच्या नवऱ्याने दारू पिऊन शिव्या दिल्या, संतप्त तरुणाने काय केले पाहा
    दोन दिवसांनतर आकाशने कार्यालयातील सागर नावाच्या युवकाशी संपर्क साधला. ‘अजून पैसे मिळाले नाहीत, आल्यास तुला पैसे मिळतील’, असे सांगितले. त्यानंतर आकाश वारंवार कार्यालयात फोन करायला लागला. त्याला पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. आकाश हा परवेजच्या कार्यालयात गेला. पटेल व त्याच्या सहकाऱ्यांनी आकाशला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.

    गोव्यात खळबळ, सर्वात मोठं ड्रग रॅकेट पकडलं, रशियन ऑलिम्पिकपटू चालवत होते काळा धंदा
    आकाशने गुन्हेशाखा पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हेशाखेने नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून परागला अटक केली. परागने अशाचप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed