• Sat. Sep 21st, 2024
जे काही कृत्य केले, ते अत्यंत वाईट, तरुणानं नोट लिहून जे केलं त्यानं कुटुंबीयांना धक्का

अकोला : ‘मी जे काही कृत्य केले, ते अत्यंत वाईट आहे. माझ्या या कृत्यामुळे माझ्या आईवडिलांना गावात मान खाली घालावी लागली. अनेकांचा रोष पत्करावा लागला. याचा मला खूप पश्चात्ताप होत आहे, तसेच प्रेमिकेलाही धोका दिला, तिने अशाप्रकारे पाऊल उचलू नये म्हणून घरच्यांनी तिच्यावर लक्ष ठेवावं, असं आवाहन करत चिठ्ठी लिहून एका युवकानं टोकाचं पाऊल उचललं आहे. आईवडिलांना एकुलता एक मुलगा असलेल्या २० वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे. अकोला जिल्ह्यातील सिसा मासा येथील स्वराज्य दत्तात्रय हगवणे (२०) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्याने काल दुपारी अकोला शहरातील गुडधीच्या रेल्वेमार्गावर रेल्वेसमोर उडी घेत जीवन संपवलं आहे.स्वराज्य दत्तात्रय हगवणे याने दोन पानांची नोट लिहून, ‘मी’ अत्यंत वाईट गोष्टी केल्या आहेत. तसेच माझ्या मैत्रिणीला म्हणजेच प्रेमिकाला फसविले आहे. माझ्या या कृत्यामुळे माझ्या आईवडिलांना शरमेने गावात मान खाली घालावी लागली याचा मला पश्चात्ताप होत आहे’, असे लिहून त्याने आत्महत्या सारखं पाऊल उचललं आहे. या प्रकरणात सिव्हील लाईन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे ठाणेदार भाऊराव घुगे करीत आहेत.

स्वराज याच्यावर या अगोदर पोलिसांत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता. नुकतीच त्याची कारागृहातून सुटका झाली होती. स्वराज हा बार्शीटाकळीतील एका महाविद्यालयात बी.कॉम प्रथम वर्षाला शिकत होता. स्वराज आईवडिलांना एकटाच मुलगा होता. त्याच्या आत्महत्येमुळे हगवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच जयंत पाटलांचा नवा दावा; मविआत उभा राहणार संघर्ष?

दोन पानांच्या नोटमध्ये म्हटले आहे की…

स्वराजनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोट मध्ये म्हटलं आहे की आयुष्यात ‘मी’ अशा चुका केल्या आहेत की त्यामुळे माझ्या आई-वडिलांना मित्रांना गावातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळं पश्चात्ताप म्हणून आज टोकाचं पाऊल उचलत आहे, माझ्यावर दाखल असलेला गुह्यात ‘मी’ मुख्य आरोपी असून तरीही याचा दोष माझ्या आई-वडिलांना मित्रांना देऊ नका. अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती असून लवकरात लवकर न्याय मिळावा. तक्रार करणाऱ्या फिर्यादीने मला व मित्राला फसविले आहे. तसेच फिर्यादी सोबत माझी जी काही स्टोरी घडली आहे, ते मी आणि बाहेरील गावातील मुलांनी केले आहे. परंतु कारण नसतानाही चांगल्या मुलांना या प्रकरणात फसवलं गेलं. आत्महत्या या कारणासाठी करतो आहे की माझ्यावर गुन्हे दाखल झाले असून कारागृहातून सुटून आल्यापासून मला कोणीही चांगलं म्हटलं नाही सर्वांनी शिव्या दिल्यात, तसेच इतर गोष्टींचाही अनुभव आला. या प्रकरणानंतर आई-वडिलांची गावात खूप इज्जत गेली, तसेच माझी प्रेमिका हिला सुद्धा धोका दिला.
पिंपरीत कोयता गँगचा धुडगूस! मेडिकल दुकानात पाण्याचे पैसै मागितले, केले धक्कादायक कृत्य

एवढं सारं झालं असल्यावर तिच्यासोबत बोललो तिला फसवलं, बाकी काही गोष्टी तिच्यासोबत केल्या असल्यामुळं मला जीवन संपावं लागत आहे. माझ्या प्रेमिकेला कोणीही त्रास देऊ नये. माझ्या प्रेमिका सोबत बोलत असताना तिने मला म्हटलं होतं जेव्हा पर्यंत स्वराज तू आहे तेव्हापर्यंत मी परंतु तिनेही यानंतर असा कुठला प्रकार करू नये, त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिच्यावर लक्ष ठेवावे, अशी विनंती ही स्वराजनं केली आहे.

कोल्हापूरमध्ये आपलं ठरलंय पॅटर्न रिटर्न्स, बाजार समितीत मविआचा दणदणीत विजय,सतेज पाटलांचं नियोजन सक्सेसफुल

घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed