• Mon. Nov 25th, 2024
    काळजाचा थरकाप उडवणारी घटना! अश्लील व्हिडिओ पाहून ८ वर्षीय मुलीवर अत्याचार

    उदयपूर:राजस्थानमधील मावळी येथे एका ८ वर्षांच्या निरागस मुलीवर बलात्कार करून खून केल्याचा आरोप असलेल्या कमलेशविरुद्ध पोलिसांनी २२ दिवसांनंतर ३०६ पानी आरोपपत्र सादर केले आहे. आरोपपत्रानुसार, कमलेशने मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यापूर्वी ३० वेळा पॉर्न फिल्म पाहिली होती. यानंतर मुलीला घरी बोलावून कमलेशने मरेपर्यंत तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या पालकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनीही आपल्या मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली.पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, आरोपी कमलेश राजपूत हा मांसविक्रीच्या दुकानात काम करायचा. त्यामुळेच निरागस मुलीची हत्या केल्यानंतर त्याचे चाकूने मृतदेहाचे १० तुकडे केले आणि ते बॅगमध्ये भरून बाथरूममध्ये लपवून ठेवले. हे कृत्य करताना त्यांचे साधे हातही थरथरले नाहीत.

    करीयरच्या संधीचे आमिष दाखवले, अभिनेत्रीसह पाच जणांना दुबईच्या तुरूंगात अडकवले, दोघांना अटक
    पालकांनीही केली मुलाला मदत

    या घटनेची माहिती कमलेशच्या पालकांना दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० मार्च रोजी कळली. तिघांनी मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कमलेश हा मृतदेहाचे तुकडे भरलेली गोणी घरापासून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या निर्जन ठिकाणी टाकण्यासाठी गेला. दरम्यान, कमलेशचे वडील रामसिंग घराबाहेर उभे होते आणि आई किशन कंवर भग्नावशेषाबाहेर उभ्या राहून मुलाला सावध करीत होते.

    खारघर दुर्घटनेचा प्रश्न उच्च न्यायालयात; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी
    काय आहे संपूर्ण प्रकरण ?

    २९ मार्च रोजी उदयपूरमधील मावळीच्या लोप्रा गावातून ८ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी मावळी पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. १ एप्रिलला पोलिसांना मुलीचा मृतदेह सापडला आणि त्याच दिवशी आरोपी कमलेशलाही अटक करण्यात आली.

    या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी घरून शेताकडे जात होती. आरोपी कमलेश घरात एकटाच होता. त्याचे आई-वडील घरी नव्हते. खिडकीजवळ बसून कमलेश मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहत होता. मुलाला जाताना पाहून त्याने आवाज देऊन तिला आत बोलावले. त्यानंतर तिला बाथरूममध्ये नेले. कमलेशच्या कृत्यामुळे मुलगी रडू लागली तेव्हा त्याने तिच्या तोंडात कपडा भरला. मुलीवर अत्याचार केल्यानंतर त्याने तिला उचलण्यास सुरुवात केली, मात्र मुलगी स्तब्ध पडून होती. अत्याचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला होता.

    तीन वाहनांचा भीषण अपघात, प्राध्यापकाचा मृत्यू , दुसऱ्याच दिवशी होता रिटायरमेंटचा कार्यक्रम

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed