• Sat. Sep 21st, 2024
आई-वडिलांना न सांगता गेला, पुन्हा परतलाच नाही; १६ वर्षीय मुलाचा धरणात बुडून करुण अंत

नाशिक: नाशिकसह सर्वत्र मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. परंतु नाशिकमध्ये या ईदच्या सणाला एका मुलाचा मृत्यू झाला आहे. ईद निमित्त गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरकडे फिरायला गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे.

या दुर्दैवी घटनेत शैबाझ नियामतअली खान (वय १६, रा. विहीतगाव, नाशिक, मूळ रा. उत्तरप्रदेश) असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. महिनाभराचा कठोर उपवास केल्यानंतर आज मोठ्या उत्साहात ईद साजरी झाली परंतु या सणाच्या दिवशीच अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कांदा अनुदानाबाबत मोठी बातमी, ई पीक पेऱ्याचा तिढा सुटला, सरकारनं मार्ग काढला,अर्जासाठी मुदतवाढ जाहीर
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या विहीतगाव येथील सहा मित्र तीन दुचाकींवरून आई-वडिलांना न सांगता गंगापूर धरणावर फिरायला गेले होते. यावेळी तेथे पोहोचल्यानंतर सर्वजण पाण्यात उतरले. शैबाझ आणि त्याचा एक मित्र अचानक बुडू लागला. त्यांच्यासोबत असलेल्या बाकीच्या चौघा मुलांनी पाण्यात बुडत असल्याचे बघून आरडाओरड केली.

त्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत एकाला पाण्याबाहेर सुखरूप काढले. मात्र, यावेळी दुर्दैवाने शैबाझ पाण्यात बुडाला. नागरिकांनी त्याला पाण्याबाहेर काढले त्यावेळी तो बेशुद्ध होता. यानंतर लगेचच त्याला तात्काळ उपचाराकरीता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची प्राणज्योत मालवली होती. यावेळी वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्याला मृत घोषित केले.

मुस्लिम बांधवांचा पवित्र असा समजला जाणारा रमजानचा महिनाभराचा कडक उपवास केल्यानंतर रमजान ईदनिमित्त सुट्टी असल्याने विहित गाव येथील सहा मित्रांनी घरी न सांगता फिरायला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी नाशिकच्या गंगापूर धरणाकडे जाण्याचे ठरवले परंतु यातील कोणालाही हे ठिकाण माहीत नसल्याने शैबाझने मोबाईल लोकेशनवरून मार्ग शोधला आणि हे सर्व गंगापूर धरण परिसरात पोहोचले. यावेळी त्यांचा पाण्यात पोहण्याचा मोह न आवरल्याने ते पाण्यात उतरले. परंतु यातील दोन अल्पवयीन मुलांसोबत अघटीत घडले. यात एकाचा मृत्यू झाला तर एकाला पाण्यात बुडता बुडता वाचवण्यात यश आले.

सुट्टीनिमित्त घरी कोणालाही न सांगता फिरायला जाणे या अल्पवयीन मुलांना चांगलच महागात पडलं आहे. या दुर्घटनेत १६ वर्षीय शैबाझचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या दुर्देवी घटनेने परिसरात ऐन सणाच्या दिवशी शोककळा पसरली आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

RCB vs RR Pitch Report: आरसीबीच्या घरात होणार राजस्थानचा हल्लाबोल, जाणून घ्या कशी आहे खेळपट्टी आणि हवामान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed