• Mon. Jul 27th, 2026

    धाराशीव हादरले! भर वर्गात चित्रकलेच्या गुरुजीने केला विदयार्थिनीचा विनयभंग, पालकवर्ग चिंतेत

    धाराशीव हादरले! भर वर्गात चित्रकलेच्या गुरुजीने केला विदयार्थिनीचा विनयभंग, पालकवर्ग चिंतेत

    धाराशीव : गुरुजी विद्यार्थ्यांची पिढी घडवतात असं सांगितलं जातं. गुरुजींना समाजात आदर्श मानलं जात. मात्र, धाराशीवमधील तुळजापूर येथे गुरुजीने या आदर्शालाच काळिमा फासण्याचे काम केले आहे. येथील एका कला शिक्षकाने एका १४ वर्षीय विदयार्थिनीचा भर वर्गात सर्व विद्यार्थ्यांसमोर विनयभंग केला. या घटनेमुळे तुळजापूरमध्ये खळबळ उडाली आहे.तुळजापूर शहरातील एका शाळेतील चित्रकलेच्या शिक्षकाने चित्रकला शिकवण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय विदयार्थीनीचा भर वर्गातच मुला-मुलींसमोर विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पालक वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तसेच या प्रकरणामुळे सर्वत्र या शिक्षकावर टीका होत आहे. तसेच संताप देखील व्यक्त केला जात आहे.

    नवा मुल्ला जोरात बांग देतो, सुषमाताई अंधारे यांना मनसेचे खरमरीत पत्र, प्रश्नांची चिरफाड
    या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक ६-१२-२०२२ रोजी सकाळी ०९ ते ९:३० दरम्यान आरोपी चित्रकला शिक्षकाने चित्रकला शिकवण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय विदयार्थीनीचा हात धरला. त्यानंतर तिच्या पाठीवरून हात फिरवत लज्जा वाटेल असे कृत्य वर्गातील मुलांसमोर आणि मुलींसमोर केले. या प्रकरणी पीडित मुलीने या घडलेल्या प्रकरणी शाळेतील प्रशासनाकडे तक्रार केली होती.

    नागपुरात वादळी पावसाचा कहर, घरावर झाड पडले, चारजण दबले, मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू
    या प्रकरणी चौकशी करुन कार्यालयीन अधिक्षक यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाच्या विरुध्द तक्रार दिली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनला ३५४,३५४(अ) भारतीय दंड विधान ८,१२, बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण अधिनियमानुसार आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी पोलीस उपविभागीय आधिकारी डॉ. सई भोरे पाटील या तपास करत आहेत.

    दुचाकीस्वाराने रिक्षा चालकाला मारली टपली आणि पुढे गेला, जाब विचारताच घडले धक्कादायक, कोणीही मदतीला आले नाही

    Pune Railway Station:पाण्याच्या दरावरून प्रवाशांची आर्थिक लूट; पुणे रेल्वे स्थानकावरील प्रकार ,रात्रीच्या वेळी रेलनीर ऐवजी इतर ब्रँडच्या बाटल्यांची विक्री
    Navnath Waghmare On Manoj Jarange | जरांगेंचा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना कसली डील? गंभीर आरोप
    Pune News: पासपोर्टसाठी प्रतीक्षा; जुन्या दराच्या सवलतीमुळे अपॉइंटमेंट वेटिंग दोन महिन्यांवर , केंद्र सरकारने दिलेल्या चार दिवसांच्या सवलतीमुळे पासपोर्टच्या अर्जांमध्ये अचानक वाढ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed