• Mon. Jul 27th, 2026

    Pune News: पासपोर्टसाठी प्रतीक्षा; जुन्या दराच्या सवलतीमुळे अपॉइंटमेंट वेटिंग दोन महिन्यांवर , केंद्र सरकारने दिलेल्या चार दिवसांच्या सवलतीमुळे पासपोर्टच्या अर्जांमध्ये अचानक वाढ

    Pune News: पासपोर्टसाठी प्रतीक्षा; जुन्या दराच्या सवलतीमुळे अपॉइंटमेंट वेटिंग दोन महिन्यांवर , केंद्र सरकारने दिलेल्या चार दिवसांच्या सवलतीमुळे पासपोर्टच्या अर्जांमध्ये अचानक वाढ

    Pune News: जून अखेरीस जुन्या दरांत पासपोर्ट काढण्यासाठी दिलेल्या चार दिवसांच्या सवलतीमुळे पुण्यासह सर्वच प्रमुख शहरांमध्ये पासपोर्टच्या अर्जात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी,पुणे: परदेशात जाण्याच्या वाढलेल्या संधींमुळे पासपोर्ट ची मागणी वाढलेली असतानाच, जूनअखेरीस जुन्या दरांत पासपोर्ट काढण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या चार दिवसांच्या सवलतीमुळे पुण्यासह सर्वच प्रमुख शहरांमध्ये पासपोर्टच्या अर्जांमध्ये अचानक वाढ झाली.

    पासपोर्ट हातात येण्यास उजाडणार ऑक्टोबर

    पुणे पासपोर्ट सेवा केंद्राच्या अपॉइंटमेंटची प्रतीक्षा यादी आता दोन महिन्यांवर गेली आहे. अर्जदाराने आज अर्ज भरल्यास त्याला सप्टेंबरअखेरची तारीख उपलब्ध असून, पासपोर्ट हातात येण्यास ऑक्टोबरचा दुसरा ते तिसरा आठवडा उजाडणार आहे.

    परराष्ट्र मंत्रालयाने १४ वर्षांनंतर २५ जूनला पासपोर्टच्या दरवाढीचे परिपत्रक प्रसिद्ध केले. नवीन दर जवळपास दुप्पट करतानाच, जुन्या दराने पासपोर्ट काढायचा असेल, तर पुढील चार दिवसांत अपॉइंटमेंट बुक करण्याचे आवाहनही केले.

    देशभरातून १५ लाख अपॉइंटमेंट

    पुणे-मुंबई नव्हे, तर संपूर्ण देशभरात १५ लाख अपॉइंटमेंट या कालावधीत नोंदवल्या गेल्या. पुण्यामध्ये जूनअखेरपर्यंत अपॉइंटमेंट मिळण्यासाठी सव्वा महिन्याचा प्रतीक्षा कालावधी होता. आता तो थेट दोन महिन्यांवर गेला आहे. पिंपरीमध्ये तर १५ ऑक्टोबरनंतरच्या तारखा उपलब्ध आहेत.

    Maharashtra TimesNashik Accident : अंत्यविधींना जाताना काळाचा घाला, नवदाम्पत्याचा करुण अंत, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यात एकत्रच शेवट

    पासपोर्टची मागणी वाढतेय

    देशाची आर्थिक प्रगती आणि लोकांची सुबत्ता वाढल्यामुळे गेल्या दहा वर्षांत पासपोर्टची मागणी वाढली आहे. प्रगत देशांमध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या अनेक नवीन संधी खुल्या झाल्या आहेत. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे हौशी पर्यटकांना खुणावत आहेत. परिणामी, दर वर्षी नवीन पासपोर्ट; तसेच नूतनीकरणासाठी येणारे अर्ज वाढत आहेत.

    म्हणून अपॉइंटमेंटच्या कालावधीचा विलंब वाढला

    मुख्य शहरांबरोबरच, लहान शहरांमध्येही पासपोर्ट काढणाऱ्यांचा टक्का वाढला आहे. प्रामुख्याने उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि दिवाळी-नाताळच्या सुट्ट्यांपूर्वी लोक पासपोर्टसाठी अर्ज करतात; त्यामुळे या कालावधीत अपॉइंटमेंटची मागणी वाढते आणि कालावधीही वाढतो. या वेळी जूनमध्ये पासपोर्टचे नवीन दरपत्रक वाढल्याने अपॉइंटमेंटच्या कालावधीचा विलंब वाढला आहे.

    Maharashtra TimesChandrpur News: चंद्रपुरातील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर मध्ये तिप्पट वन्यजीव ; १३ वाघ आणि पाच बिबट्यांचा समावेश

    रोज एक हजार ७०० अपॉइंटमेंट

    पाषाण येथील पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये रोज एक हजार ७०० अपॉइंटमेंट दिल्या जातात.याशिवाय तत्काळ च्या आणि इतर वॉक इन श्रेणीतील अपॉइंटमेंट धरून दोन हजार लोकांचे अर्ज स्वीकारले जतात. अर्जदारांना एसएमएस द्वारे एक दिवस आधी वेळेची आठवणही केली जाते

    तरीदेखील दररोज किमान दहा टक्के अर्जदार अनुपस्थित असतात. हे अर्जदार पुन्हा नवीन वेळ घेतात.त्याचा फटका सध्या तातडीने पासपोर्टची गरज असलेल्या नागरिकांना बसतो. पासपोर्ट गांभीर्य लोकांनी ओळखले पाहिजे असे आवाहन पुण्याचे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी केल आहे.

    पासपोर्ट अपॉइंटमेंटसाठी सध्या मिळणाऱ्या तारखा

    केंद्र उपल्बध तारखा

    पुणे पासपोर्ट सेवा केंद्र -२३ सप्टेंबर
    पुणे पासपोर्ट सेवा केंद्र तत्काळ- ३० जुलै
    पिंपरी-चिंचवड पीओपीएसके – १५ ऑक्टोबर
    बारामती पीओपीएसके – १७ ऑगस्ट
    सोलापूर पासपोर्ट सेवा केंद्र-१ सप्टेंबर
    शिरूर पोओपीएसके -२० ऑगस्ट
    सातारा पीओपीएसके -३१ ऑगस्ट
    कोल्हापूर पीओपीएसके-२८ ऑगस्ट

    टीम मटा ऑनलाइन

    लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.… आणखी वाचा