मृणाली उर्फ पूजा जितेंद्र कश्यप (वय २८, रा. फुटाळा) व अश्विन पंढरीनाथ कोडापे (वय ३६, रा. आदर्शनगर, वाडी) अशी अटकेतील जबरी चोरी करणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिलचंद हा प्रॉपर्टी डीलर असून खासगी व्यवसाय करतो. अश्विन व मृणाली वाडी परिसरात कापडाचा व्यवसाय करतात.
सिलेंडर उचलून घेत महागाईविरोधात काँगेस महिलांचे आक्रमक आंदोलन; थेट रस्त्यावरच मांडली चूल
खिलचंदला नवीन कार खरेदी करायची होती. त्यासाठी २७ मार्चला तो वाडीतील एका कारच्या शोरुममध्ये गेला. त्याने कार बुक केली. कार बुक करण्यासाठी त्यांच्याकडे रोख नव्हती. तो शोरूममधून बाहेर आला आणि अश्विनच्या दुकानावर गेला. ‘मी तुला ऑनलाइन दहा हजार रुपये देतो, तू मला तेवढीच रोख दे’, असे खिलचंद अश्विनला म्हणाला. अश्विनने होकार दिला. खिलचंदने ऑनलाइन त्याच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा झाल्यानंतर ‘माझ्याकडे रोख नाही’, असे अश्विनने त्याला सांगितले. खिलचंदने पैसे परत मागितले. अश्विनने पैसे देण्यास नकार दिला. दोघांमध्ये वाद झाला.
खिलचंद तेथून परतला. त्याने मोबाइलवरून संपर्क साधून अश्विनला पैशाची मागणी केली. १३ एप्रिलला अश्विन व मृणाली या दोघांनी खिलचंदला भेटायला बोलाविले. दोघेही त्याच्याच कारने पेठ ग्रामपंचायतीसमोर गेले. तेथे दोघांनी त्याला मारहाण केली. मृणालीने कटरने खिलचंदच्या हातावर वार केले. पुन्हा लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केली. त्याच्याकडील पावणेदोन लाख रुपये किमतीच्या दोन सोनसाखळ्या व त्याची एमएच-१४-बीडब्ल्यू-००१८ या क्रमांकाची कार घेऊन दोघेही पसार झाले.
खिलचंदने हिंगणा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघ यांनी शोध घेऊन दोघांना अटक केली. दोघांची सोमवारपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.