• Sat. Sep 21st, 2024
कोलाहल ऐकून गेली न् जीवास मुकली, ग्रँट रोडच्या हल्ल्यात मृत १८ वर्षीय तरुणीस शोकाकुल निरोप

मुंबई : दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड परिसरात शुक्रवारी दुपारी अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. चेतन गाला नामक ५४ वर्षीय माथेफिरु रहिवाशाने आपल्याच इमारतीत राहणाऱ्या पाच शेजाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. या हल्यात जयेंद्रभाई मिस्री (वय ७७ वर्ष) त्यांची पत्नी ईलाबाई मिस्री (वय ७० वर्ष) या दाम्पत्यासह जेनील ब्रह्मभट या १८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जेनीलच्या पार्थिवावर आज अत्यंत शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या अंतिम प्रार्थनेत इमारतीतील रहिवाशी सहभागी झाले होते.जेनीलची आई स्नेहल ब्रह्मभट (४८) आणि प्रकाश वाघमारे (५५) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रिलायन्स आणि नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी चेतन गाला यास अटक केली आहे. शेजाऱ्यांनी भडकवल्यामुळे पत्नी आणि मुले सोबत राहत नसल्याच्या समजातून चेतनने हा चाकूहल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर राहणारा चेतन गाला आपल्या घराबाहेर आला. शेजारच्या घरात राहणारे जयेंद्रभाई आणि त्यांची पत्नी ईलाबाई गॅलरीतील कठड्याजवळ बसले होते. यावेळी जोरजोरात ओरडत चेतनने धारदार चाकूने दोघांवर हल्ला केला. वयोमानामुळे दोघांना प्रतिकार करता आला नाही. याच इमारतीत घरकाम करणारे प्रकाश वाघमारे गॅलरीत झोपले होते. आवाज ऐकून ते उठणार इतक्यात चेतनने त्यांच्याही पोटात चाकू भोसकला. परंतु उशी पुढे धरल्याने त्यांचा घाव खोलवर गेला नाही.

चेतनच्या पत्नीची मैत्रीण असलेल्या स्नेहल ब्रह्मभट आणि त्यांची मुलगी जेनील या दोघीही आरडाओरडा ऐकून पहिल्या मजल्यावरुन वर गेल्या. मात्र संतापलेल्या चेतनने त्यांच्यावरही वार केले. रक्तबंबाळ अवस्थेतच दोघी कशाबशा खाली आल्या. जेनीलची बहिण देवांशीही पुढे जात होती, मात्र आई आणि बहिणीची अवस्था पाहून ती मागे फिरली, त्यामुळे ती या हल्ल्यातून बचावली.

चेतनला पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. दोन-तीन महिन्यांपासून पत्नी आणि मुलं जवळच असलेल्या इमारतीतील महिलेच्या माहेरी राहत आहेत. चेतन वारंवार त्यांना घरी येण्याची विनंती करत असे, पण कुणीही ऐकत नव्हतं. बुधवारी सकाळीही चेतनने आपल्या मुलाला फोन केला आणि घरी येण्याची विनंती केली. मात्र त्याने आईचं नाव पुढे केल्याने चेतन संतापला. काही वेळाने त्याची मुलगी जेवणाचा डबा घेऊन घरी आली. तेव्हा त्याने तिच्याकडेही नाराजी व्यक्त केली होती.

पाहा व्हिडिओ :

आपले शेजारी पत्नीला भडकवत असल्याने ती सोबत राहत नसल्याचा चेतनला संशय होता. संशयाच्या भुताने डोक्यात घर केल्यामुळेच त्याने शेजाऱ्यांवर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आठ दिवसांपूर्वीच त्याने एक चाकू आणला होता. मात्र याची माहिती मिळाल्यानंतर पत्नी आणि मुलांनी तो काढून घेतला. नंतर त्याने आणखी चाकू आणला त्यानेच हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.

बाईकसमोर बैल आडवा, तरुणाचा भीषण अपघात; नर्स पत्नीचे शर्थीचे प्रयत्न, पण काळापुढे हात टेकले
पार्वती मॅन्शन ही इमारत मुख्य रस्त्यावर असल्याने बाहेर प्रचंड गर्दी जमा झाली होती. ही गर्दी आरडाओरड करुन हल्लेखोर चेतनला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, मात्र तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. अखेर पहिल्या मजल्यावरील काही रहिवासी धीर करुन वर गेले, तेव्हा तो स्वतःच्या घरी पळाला.

ग्रँटरोडच्या चाळीत रक्तरंजित थरार! चेतन गालाने १० वर्षांच्या आरव शहाला पकडलं, चाकूचं पातं फिरवणार, इतक्यात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed