• Tue. Sep 1st, 2026

प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांची अपर मुख्य सचिवपदी पदोन्नती – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 1, 2026

मुंबई , दि. १:- आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांची अपर मुख्य सचिवपदी (एसीएस) पदोन्नती झाली आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी त्यांचे पदोन्नतीबद्दल अभिनंदन केले.

यावेळी संचालक (प्रशासन) डॉ. किशोर गांगुर्डे, संचालक (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, उपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळे, उपसंचालक (प्रकाशने) जगदीश मोरे, सहाय्यक संचालक इरशाद बागवान हे उपस्थित होते.

अपर मुख्य सचिव विनीता वेद सिंगल या १९९६ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या वरिष्ठ अधिकारी आहेत. ७ जुलै १९७० रोजी जन्मलेल्या विनीता सिंगल यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी (एमए) प्राप्त केली आहे. त्या सध्या आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत; यापूर्वी त्यांनी प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, व्यवस्थापकीय संचालक, महानगरपालिका आयुक्त, महासंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सचिव, आयुक्त आणि उपविभागीय अधिकारी अशा विविध पदांवर काम केले आहे.

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed